Chhaava Box Office Collection Day 1: छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी केली विक्रमी कमाई!

Chhaava Box Office Collection Day 1: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने नागरिकांना वेड लावलेले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केलेली आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेला असून ऐतिहासिक चित्रपट छावा नी पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याने मोठी चर्चा सध्या रंगू लागलेली आहे. प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹31 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. Chhaava Box Office Collection Day 1

पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन Chhava box office collection on the first day:

  • हिंदी भाषेतील एकूण ऑक्युपन्सीः 42.02%
  • शहरानुसार ऑक्युपन्सीः
  • पुणे : 89.75%
  • मुंबई : 62.50%
  • हैदराबाद : 56.75%
  • चेन्नई : 35.50%
  • बेंगळूर : 34.75%

या आकडेवारीनुसार, छावा या चित्रपटाने विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग कलेक्शन साध्य केलेले आहे. यापूर्वी, त्यांच्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹8.62 कोटी, सॅम बहादूर ने ₹5.75 कोटी, जरा हटके जरा बचके या चित्रपटाने ₹5.49 कोटी, भूत: पार्ट वन- द हॉन्टेड शिप, या चित्रपटाने ₹5.10 कोटी रुपये कमावले. तर उरी- द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाने ₹8.20 कोटी रुपये कमावले. मनमर्जीया या चित्रपटाने ₹3.52 कोटी आणि राजी या चित्रपटाने ₹7.53 कोटी कोटी रुपयाची कमाई केली होती.

हे पण वाचा | chhava movie box office collection : रिलीज होण्यापूर्वीच कमावले, इतके कोटी रुपये

प्रेक्षकांचा प्रतिसाद :

ऑनलाइन प्रेक्षकांनी छावा चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. विकी कौशलच्या प्रभावी अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे, तसेच चित्रपटाच्या शेवटच्या 20 मिनिटांचा थरार प्रेक्षकांना भावला आहे. देशभक्तीपर थीम, आकर्षक कथा आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासारखा असल्याचे प्रेक्षकांनी सांगितले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांचे मत

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी छावा चित्रपटाला 5 पैकी 4.5 स्टार रेटिंग दिली आहे. त्यांनी एक्स वरील पोस्टमध्ये लिहिले आहे. इतिहास, भावना, आवड, देशभक्ती आणि कृती यांचे उत्कृष्ट मिश्रण विकी कौशल हा एक उत्तम कलाकार आहे, जो त्यांच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांचे स्थान मजबूत करतो. लक्ष्मण उतेकर एक कथाकार म्हणून यशस्वी होतो.

छावा बदल:

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक छावा चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसूबाईची भूमिका निभवली आहे. हा चित्रपट मराठा साम्राज्याच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, शूर राजाच्या जीवनातील संघर्ष आणि पराक्रमाचे वर्णन करतो.

जवळ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या या विक्रमी कमाई मुळे, आगामी दिवसांमध्ये चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. प्रेक्षकांचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता छावा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे.

शेवटचे शब्द :

देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।।

बातमी स्त्रोत : Sacnilk.com

Leave a Comment

error: Content is protected !!