काय सांगता भाऊ… 15 ते 17 जुलैचा काळ या 5 राशींसाठी अत्यंत कठीण! तुमची रास आहे का यामध्ये?

Check Today Horoscope : या जगात प्रत्येक गोष्ट एखाद्या शक्तीच्या अधीन आहे असं म्हटलं जातं आणि वैदिक ज्योतिषशास्त्र तर याच अनाकलनीय शक्तींना तारतम्याने मांडण्याचं शास्त्र मानलं जातं. सध्या अशीच एक धडकी भरवणारी ग्रहस्थिती तयार होतेय जी काही निवडक राशींना जबरदस्त मानसिक, आर्थिक व वैयक्तिक आघात देऊ शकते. कारण येत्या 15 ते 17 जुलै 2025 दरम्यान, चंद्र, राहू आणि शनि यांचे दोन मोठे अशुभ योग तयार होणार आहेत “ग्रहण योग” आणि “विष योग” ज्यामुळे 5 राशींना फार हाल सहन करावे लागणार आहेत. Check Today Horoscope

13 जुलैला शनिची वक्री चाल सुरु झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी चंद्र व राहू यांची युती होऊन ग्रहण योग तयार झाला. यानंतर, 15 जुलै रोजी चंद्र व शनीची युती होणार असून त्यामुळे निर्माण होईल विष योग. या दोन्ही योगांचा परिणाम 17 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

या काळात काही राशींना मानसिक अस्थिरता, व्यावसायिक नुकसान, आरोग्याचे प्रश्न, नात्यांमध्ये तणाव व कायदेशीर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. चला पाहूया, कोणत्या पाच राशींसाठी हा काळ विशेष त्रासदायक ठरणार आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना या काळात कामांमध्ये अडथळे येणार आहेत, कोणतीही योजना यशस्वी होईल असं वाटत असतानाच काहीतरी वाईट घडू शकतं. सरकारी कामकाज किंवा कोर्टकचेरीशी संबंधित गोष्टींमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मनात चिडचिड, घालमेलीचा अनुभव येईल. विरोधक व गैरसमज वाढू शकतात. प्रवास टाळावा आणि मोठे निर्णय पुढे ढकलावेत.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल. घरातील लोकांशी सतत छोटे-मोठे वाद निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही सुसंवाद कमी होईल आणि जर तुम्ही व्यवसायात भागीदारीत असाल तर त्यातही मतभेद टोकाला जाऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं ठरेल. या काळात कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं.

कन्या राशी Virgo

कन्या राशीच्या लोकांसाठी व्यवसाय व आर्थिक व्यवहार अतिशय नाजूक वळणावर आहेत. कोणालाही उधार देणं टाळा. कर्ज घेणं अथवा देणं, कोर्ट-कचेरीच्या फेऱ्यात अडकणं या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. कोणत्याही नवीन भागीदारीचं काम पुढे ढकलावं. विश्वास ठेवण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

कुंभ राशी Aquarius

या राशीतच चंद्र-राहू ग्रहण योग तयार होणार असल्यामुळे मनाची स्थिरता ढळेल. आत्मविश्वासात कमालीची घट होईल, विचारांचा गोंधळ वाढेल. पैशांची गुंतवणूक अयोग्य ठरेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घरात वाद, गैरसमज, आणि भावनिक दडपण वाढेल.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आरोग्याची दृष्टीने हा काळ अत्यंत नाजूक आहे. अचानक एखादा त्रास किंवा जुना आजार परत उफाळून येऊ शकतो. याशिवाय नात्यांमध्ये गैरसमज, प्रतिष्ठेवर आघात आणि मानसिक थकवा जाणवेल. काही गोष्टी तुमच्या नकळत चुकीच्या पद्धतीनं मांडल्या जातील त्यामुळे लोकांचं गैरसमज होऊ शकतो.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही फक्त वाचकांसाठी बनवले आहे आणि सर्व प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा शंभर वर्षांनी बनतोय जबरदस्त योग ! उद्यापासून ‘या’ 3 राशींना होणार धनवर्षा, वाईट काळ संपला आता सुरू होईल सुवर्णकाळ !  

Leave a Comment

error: Content is protected !!