Chanakya Niti: या 3 लोकांना कधीच सांगू नका तुमच्या भविष्यातील प्लॅन, नाहीतर पुन्हा पश्चाताप करत बसाल


Chanakya Niti | कधी कधी आपण आपल्या मनातलं काही खास गुपित एखाद्याला सांगतो. वाटतं, हा माणूस आपला आहे. पण पुढे काही कारणामुळे जर त्याच्याशी संबंध बिघडले, तर तोच माणूस आपली तीच माहिती आपल्याविरुद्ध वापरतो. हेच सांगून गेलेत चाणक्य ते सुद्धा हजारो वर्षांपूर्वी. Chanakya Niti

आर्य चाणक्य हे केवळ एक राजकारणाचे जाणकार नव्हते, तर जीवन कसं जगावं हे शिकवणारे महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती या ग्रंथात आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल मोठ्या शिकवणी दिल्या. त्यातच त्यांनी असंही सांगितलंय की, काही माणसांना आपलं गुपित किंवा योजना सांगणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारणं.

ते म्हणतात, “कोणतीही योजना पूर्ण होईपर्यंत कुणालाच सांगू नका.” कारण सुरुवातीला जरी तुमचा मित्र असला तरी पुढे कधी भांडण झालं, मनोमालिन्य झालं तर तोच तुमच्या मार्गात अडथळा ठरू शकतो.

चाणक्य म्हणतात, अशा 3 प्रकारच्या लोकांना कधीही आपलं गुपित सांगू नये

स्वार्थी माणूस : ज्याचं सगळं आयुष्यच ‘माझा फायदा कुठे आहे?’ या एका प्रश्नाभोवती फिरतं, त्या स्वार्थी माणसाकडे तुमचं गुपित सांगितलं तर तो तुमचा उपयोग करून घेईल आणि नंतर पाठ फिरवेल.

सर्वांचाच मित्र असणारा : जो माणूस सगळ्याच बाजूंशी गोड बोलतो, सगळ्याच गटांशी मिळून मिसळून असतो, तो कोणाचाच खरा मित्र नसतो. चाणक्य म्हणतात, असा माणूस कोणाकडचंही गुपित दुसऱ्याकडे सहज पोहचवू शकतो.

तुमच्या भावना न समजणारा : जो तुमचं म्हणणं, तुमचा त्रास किंवा भावना यांना किंमत देत नाही, तो तुमचं गुपित कधीच जपणार नाही. अशा माणसाला काही सांगून काही उपयोग नाही, उलट नाशच होईल.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारित आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

चाणक्यहे पण वाचा | Chanakya Niti: या ४ लोकांच्या पाठीमागे लक्ष्मी कधीच राहत नाही! चाणक्य नीति मते त्यांनी श्रीमंत होण्याचं स्वप्न तात्काळ सोडून द्यावं!

Leave a Comment

error: Content is protected !!