चाणक्य म्हणतात पती-पत्नीने एकत्र राहून ‘हे’ केल्यास कधीही पैशाची चणचण भासत नाही! श्रीसंपत्ती नांदते त्या घरातच…


Chanakya Niti | आजच्या धावपळीच्या काळात पैसा, समाधान आणि सौख्य मिळवण्यासाठी माणूस कितीही धडपडत असला, तरी काही वेळा घरात सतत वाद, गैरसमज आणि मानसिक तणाव असतो आणि मग हे सगळं मिळालं तरी समाधान हरवतं. या सगळ्याचा खोल विचार हजारो वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यांनी आपल्या ‘नीतीशास्त्रात’ केला आहे. ते म्हणतात, केवळ धन मिळवणं पुरेसं नाही, ते घरात टिकवण्यासाठी विशिष्ट शिस्त, विचारधारा आणि सुसंवाद गरजेचा आहे. चाणक्यांच्या मते ज्या घरात पती-पत्नीमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सहकार्य असतं, तिथे स्वतः लक्ष्मी वास करायला येते.Chanakya Niti

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

चाणक्यनीतीतील एक अत्यंत प्रसिद्ध श्लोक

“मूर्खा यत्र न पुज्यन्ते, धान्यं यत्र सुसञ्चितम् ।दाम्पत्ये कलहो नास्ति, तत्र श्रीः स्वयमागता ।।”

या श्लोकाचा अर्थ खूप खोल आहे. चाणक्य सांगतात की ज्या घरात अज्ञानी किंवा मुर्ख माणसांचा सन्मान होत नाही, जिथे अन्नधान्याची शिस्तबद्ध साठवणूक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे पती-पत्नीमध्ये कधीही भांडण किंवा मनोमालिन्य होत नाही, तिथे श्री म्हणजे लक्ष्मी शांती, स्थैर्य आणि समाधानाचं रूप आपोआप नांदायला लागते. अशा घरात वैभव नुसतं येत नाही, तर टिकतंही.

आज कित्येक कुटुंबांमध्ये पती-पत्नीमधील संवाद हरवतोय, निर्णय घेताना मतभेद होतात, एकमेकांवर कुरघोडीची भावना असते. अशा घरात हळूहळू मानसिक ताण निर्माण होतो, आणि मग त्या घरात कितीही पैसा आला तरी मन:शांती राहत नाही. चाणक्य असं स्पष्ट सांगतात की, श्री म्हणजे फक्त नोटा किंवा दागिने नाहीत, तर ती एक ऊर्जा आहे जी घरातील सुसंवाद, प्रेम, सन्मान आणि शिस्तीवर आधारित असते.

जिथं अन्नाचं योग्य साठवण आहे, जिथे गरजेचं तेव्हा काहीही कमी पडत नाही, आणि जिथे नवरा-बायको एकत्र बसून निर्णय घेतात, कुटुंबासाठी परिश्रम करतात, एकमेकाचा सन्मान राखतात तिथंच खऱ्या अर्थाने धन-धान्य नांदतं. अशा घरात घराची लक्ष्मीही आनंदी राहते आणि देवतेची लक्ष्मीही. Chanakya Niti

ग्रामीण भागात आजही कित्येकदा असा गैरसमज असतो की पैशासाठी फक्त मेहनत केली की तो मिळेल. पण चाणक्य सांगतात, मेहनतीसोबत विचारांची समजही असावी लागते. घरात वादाचा माहोल नसेल, तर ते घर आपोआप श्रीमंत होऊ लागतं. श्रीमंती ही केवळ बँकेतील शिल्लक नाही, ती एक भावनिक समृद्धी आहे जिथे तणाव नाही, भीती नाही, आणि एकमेकांवर विश्वास आहे.

म्हणूनच, आजच्या काळातही चाणक्यनीती तितकीच उपयुक्त आहे. फक्त नोकरी, व्यवसाय किंवा इन्व्हेस्टमेंट पुरेसे नाही, तर तुमचं घर, तुमचं नातं, तुमचं एकमेकांवरचं प्रेम हेच खरे श्रीचे प्रवेशद्वार आहे.

हे पण वाचा | राशिभविष्य 2025 : या राशीसाठी पुढचे 30 दिवस असणार खास! वाचा सविस्तर माहिती

(Disclaimer: वर दिलेली माहिती केवळ, वाचकांसाठी आहे आणि कुठलाही दावा केला जात नाही, कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित गोष्टीची चौकशी करा)

1 thought on “चाणक्य म्हणतात पती-पत्नीने एकत्र राहून ‘हे’ केल्यास कधीही पैशाची चणचण भासत नाही! श्रीसंपत्ती नांदते त्या घरातच…”

Leave a Comment

error: Content is protected !!