Business Idea : मित्रांनो सध्या तुम्हाला तर माहीतच आहे नोकरी करणे किती कठीण झालेला आहे. परंतु तुम्ही जर एखादा छोटासा व्यवसाय करायचा विचार करत असाल आणि चांगला मोठा नफा कमवायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ही बातमी घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला व्यवसाय संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. यामध्ये तुम्ही छोटासा दुकान टाकून चांगला नफा मिळू शकणार आहात. पण यासाठी लागणारे बजेट किती व कशा पद्धतीने तुम्ही सुरु करू शकता याची माहिती यामध्ये दिलेली आहे. Business Idea
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक
कधी कधी मोठ्या नोकऱ्यांचा विचार करत बसायचं आणि दिवसेंदिवस हातचं काम चुकवत राहायचं, पण भाऊ… जर तुमच्याकडे थोडं भांडवल असेल, आणि मेहनतीची तयारी असेल, तर कमाईचा मार्ग मुंबईत उघडाच समोर आहे. जीन्स, ट्रॅकपँट, लायक्रा, शर्ट… अगदी सगळं काही फक्त 200-400 रुपयांच्या रेंजमध्ये मिळतंय आणि हे सगळं कुठं? तर मुंबईच्या सायन स्टेशनच्या अगदी शेजारी ‘के. निप्रा गारमेंट्स’ नावाच्या होलसेल दुकानात!
भाऊ, तुम्ही जर गारमेंट्सचा किंवा कपड्यांचा व्यवसाय सुरु करायचा विचार करत असाल, तर यापेक्षा चांगली सुरुवात काहीच असू शकत नाही. फक्त 200 रुपयांना एकदम ट्रेंडी जीन्स घेऊन या आणि चांगल्या लोकेशनवर किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तीच जीन्स आरामात 500-600 रुपयांना विकता येते. म्हणजे साध्या गणितात पाचशे रुपयांचं उत्पन्न एका पँटवरून.
या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंची यादी बघितली तर मनातच धडधडायला लागतं जीन्स, लायक्रा पँट्स, ट्रॅकपँट्स, कार्गो, जॉगर, फॉर्मल पँट्स आणि शर्ट्ससुद्धा. किंमती काय विचारता? लायक्रा पँट्स फक्त 150 रुपयांत, जीन्स 200 रुपयांत, आणि बाकी सगळं देखील चांगल्या दर्जात, कमी किंमतीत.
अर्थात भाऊ, या व्यवसायाची छोटीशी अट आहे तुम्हाला किमान 50 पीस खरेदी करावे लागतील. म्हणजे सुरूवात करताना साधारण 10-15 हजारांचं भांडवल लागेल. पण एवढ्या भांडवलातून तुम्ही चांगली उलाढाल करू शकता आणि नफा मिळवू शकता, हे नक्की. विशेषतः गावाकडच्या किंवा उपनगरातल्या तरुणांसाठी ही संधी सोन्यासारखी आहे स्वतःचा व्यवसाय, कोणाच्या हाताखाली नोकरी नाही आणि दर महिन्याला निश्चित कमाई!
थोडक्यात सांगायचं झालं, तर तुमच्याकडे जर इच्छा आहे, मेहनत करायची तयारी आहे आणि थोडंसं भांडवल आहे, तर हा गारमेंट्सचा व्यवसाय तुमचं आयुष्यच बदलून टाकू शकतो. मार्केटिंग शिकायला फार मोठं शिक्षण लागत नाही, सोशल मीडियावर एक-दोन व्हिडिओ टाका, लोकांना दर सांगितले की माल विकला जातो. सुरुवात लहान असली तरी ध्येय मोठं ठेवा आणि ही संधी हातातून जाऊ देऊ नका.
आपण पाहिले की, अशा पद्धतीने एक व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकतो. या पद्धतीने तुम्ही छोटेसे दुकान टाका आणि तिथे असे स्वस्त मध्ये कपडे विका जेणेकरून तुम्हाला चांगला नफा होणार आहे. अन अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल
हे पण वाचा | हा व्यवसाय सुरू करून तुम्ही वर्षाला मिळू शकता 7 लाख रुपये, नोकरीपेक्षा जास्त कमाई