पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे ₹2000 कधी मिळणार? शेतकरी मोठ्या चिंतेत!


Beneficiary Status: सध्या देशभरात करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना हा हप्ता जून महिन्यात मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आता जुलै चा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे तरी केंद्र सरकारकडून हा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार? याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा| सोनं झालं स्वस्त! एका झटक्यात इतक्या रुपयाने घसरल्या किमती? पहा तुमच्या शहरातील नवीन दर..

20 व्या हाताची प्रतीक्षा..

पी एम किसान योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत 3.69 लाख कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री यांनी लोकसभेत याबद्दल माहिती दिली आहे. या योजनेनुसार दरवर्षी तीन समान हफ्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. पी एम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला होता. ज्यात दहा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 23 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. यानंतर 20 वा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती. मात्र जुलै महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असले तरी शेतकऱ्यांना या योजनेचा 20 वा हप्ता मिळालेला नाही.

पीएम किसान योजनेचा अजूनही 20 वा हप्ता मिळाला नसल्यामुळे कृषी मंत्रालयाने लवकरच हप्ता मिळेल अशी सांगितले आहे. मात्र नेमकं तारीख जाहीर न केल्यामुळे सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सध्या अनेक राज्यांमध्ये खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असताना, या पैशाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी अधिकच त्रासदायक ठरत आहे. पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता संचारत आहे.

पीएम किसान योजना लहान आणि गोरगरीब शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मात्र आयकर भरणारे नागरिक शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि काही विशिष्ट उत्पन्न गटातील लोक या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत. खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक आधार मिळवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. Beneficiary Status

हे पण वाचा| तूर बाजारभावात तेजी! लाल तुरीला जास्त मागणी, आवक घटली पण दर वाढले; वाचा सविस्तर

20 वा हप्ता कधी मिळू शकतो?

सध्या मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्रालय आणि पीएम किसान पोर्टल वरील माहितीनुसार, विसावा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तांत्रिक पडताळणी लाभार्थी यादीची पडताळणी आणि आधार लिंकिंग प्रक्रियेमुळे हप्ता वितरण्यास विलंब लागत असावा. देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचे डोळे आता केंद्र सरकारकडून येणाऱ्या पुढील घोषणाकडे लागले आहेत. खरीप हंगामात आर्थिक मदत गरजेची असल्यामुळे सरकारने लवकरात लवकर विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करावे, त्याबद्दलची तारीख जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!