Beneficiary Status: केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. यापैकीच एक शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारची पी एम किसान योजना शेतकऱ्यांमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये जास्त लोकप्रिय झाली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे थेट जमा केला जातो. 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत जमा केली जात आहे.
पी एम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्याची प्रत्येकी दोन–दोन–दोन हजार रुपये याप्रमाणे जमा करण्यात येतात. अशाप्रकारे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये दिले जातात. शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्ते मिळाले आहेत. यानंतर आता 20 वा हप्ता सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. दरम्यान 20 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. Beneficiary Status
हे पण वाचा | नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ होणार; नमोचा पुढील हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर…
पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत. केंद्र सरकार दर चार महिन्याच्या अंतरानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करतात. 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यामुळे ही पार्श्वभूमी लक्षात घेता विसावा हप्ता हा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र अजून केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही. Beneficiary Status
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी येणाऱ्या खर्च भागवण्यासाठी या योजनेच्या पैशाची मदत व्हावी. अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जर केंद्र सरकारने जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा केले तर शेतकऱ्यांना बी भरण्यासाठी व शेतीची मशागत करण्यासाठी मोठी मदत मिळेल. त्यामुळे शेतकरी देखील या महिन्यातच त्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतील अशी अपेक्षा धरत आहेत.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेतून 19 लाखाहून अधिक महिला अपात्र; तुम्ही या सरकारी पडताळणीत आलात का?
पी एम किसान योजनेअंतर्गत नियमत काही बदल केले आहेत. या नवीन नियमानुसार या योजनेचा ला कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे. म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आलेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार आहे. जर तुम्ही तुमचे ओळखपत्र तयार केले नसेल तर जवळील सीएससी केंद्रामध्ये भेट देऊन त्वरित आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी तुमची पी एम किसान योजनेची ई केवायसी पूर्ण किरणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा 20 वा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर या योजनेची रक्कम महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹1500 रुपये नाहीतर, डायरेक्ट ₹3000 रुपये जमा होणार! वाचा सविस्तर माहिती
लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा यापूर्वी ला मिळत आहे मात्र यावेळी लाग मिळेल का नाही यासाठी लाभार्थी यादी तपासणी आवश्यक आहे. शेतकरी त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे का नाही हे तपासू शकतात. त्याचबरोबर शेतकरी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया झाली आहे का नाही हे देखील तपासू शकतात. पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची लाभार्थी यादी जिल्ह्यानुसार तालुक्याने सर्व गावानुसार पाहू शकता.
1 thought on “आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही? पहा..”