Pm Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 रुपये कधी येणार! यादीमध्ये तुमचे नाव आहे का? तपासा


Beneficiary Status : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी राबवावर येणारी महत्वकांशी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळत आहे. या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये थेट DBT द्वारे तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. यातील प्रत्येक हप्ता ₹2000 रपयांचा असतो आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येक चार महिन्यांनी जमा होतो. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरमध्ये विश्व हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागली असून त्यासंदर्भात एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे. सरकारने याआधी 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये दिला गेला आणि पुढील हप्ता जूनच्या अखेरीस येण्याची शक्यता आता प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे. Beneficiary Status

20 वा हप्ता कधी येणार?

फेब्रुवारी 2025 मध्ये तब्बल 22000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. दर 4 महिन्यांनी हा हप्ता दिला जात असल्यामुळे 20 वा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

e-KYC अनिवार्य, नाही केल्यास हप्ता रोखल जाईल

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ekyc करणे अनिवार्य आहे. Otp आधारित E-KYC Pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर करता येतो. जर ऑनलाईन सुविधा नसेल, तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक KYC पूर्ण करू शकता. जर हे केलं नाही, तर तुमचा हप्ता थांबवण्यात येऊ शकतो.

तुमचं नाव यादीत आहे का? असा करा स्टेटस तपासा

  • या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जा.
  • उजव्या बाजूला ‘Know Your Status’ या पर्यावर क्लिक करा.
  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व कॅपच कोड भरा
  • ‘Get Data वर क्लिक करतास तुमचं नाव आणि हप्ता स्टेटस समोर येईल.

लाभार्थी यादी कशी तपासाल?

  • वेबसाईटवर Beneficiary List हा पर्याय उघडा.
  • त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा
  • त्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा
  • संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल त्यातून तुमचं नाव तपासून पहा

हप्ता येत नसेल तर खालील हेल्पलाइन नंबर ट्राय करा

PM किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261/ 011-24300606

शेतकरी बांधवांनो, हप्ता मिळवण्यासाठी सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करा आणि योग्य माहिती तपासून खात्री करा, जेणेकरून शासनाचा लाभ थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!