Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांशी योजनेपैकी पीएम किसान सन्मान निधी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजार रुपये प्रमाणे दर 4 महिन्याच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेअंतर्गत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पी एम किसान सन्मान नधी योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून शेतकऱ्यांना देण्यात आला होता. यानंतर शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. राज्यातील 92 लाख 55 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीय योजनेचा लाभ मिळत आहे. त्याचबरोबर देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. Beneficiary Status
हे पण वाचा | किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे 5 लाख रुपये कर्ज; अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..
वेळेनुसार या योजनेतील 19 व्या हप्त्याचे पैसे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार दौऱ्याला जाणार आहेत. त्यावेळी फेब्रुवारी महिन्यातील 24 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देऊन आनंददायी करू शकतात. Beneficiary Status
केंद्रीय कृषी मत्रालय त्याबाबत नियोजन करत आहे. कृषी आयुक्तालयातील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपयाची मदत चार महिन्याच्या टप्प्याने तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान चा अठरावा हप्त्याचे वितरण ऑक्टोबर महिन्यात केले होते. यावेळी 20,000 कोटी रुपये सर्व देशातील नऊ कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. यापैकी यापैकी 1890 कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्राने यावेळी केवायसी करणे आणि आधार सोबत बँक खाते लिंक असणे अशा काही अटी नेमलेल्या आहेत.
हे पण वाचा | सोन्याच्या किमतीत नवीन विक्रम! दरात झाली मोठी वाढ, पहा आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर
पी एम किसान योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात 96 लाख 99 हजार एवढी आहे. परंतु राज्यातील जवळपास चार लाख शेतकरी या अटीमध्ये बसत नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान योजनेचा व महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही. नमो शेतकरी योजना देखील पी एम किसान योजनेसारखीच आहे. या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी पात्र शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणारेच आहेत. या दोन्ही योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. नमो शेतकरी योजनेअंतर्गत पाच हप्ते वितरित केले असून या योजनेचा सहावा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्यातच वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र शासनाने आतपर्यंत पी एम किसान योजनेतील 11 कोटी शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम महाडीबीटी द्वारे दिली आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा केले जातात. देशातील असे अनेक शेतकरी आहेत की त्यांना प्रश्न पडतो या योजनेचे रक्कम कुटुंबातील दोघांना मिळतो का? तर या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर आहे नाही, कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील पती-पत्नी एकत्र या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत फक्त एवढी रक्कम गुंतवा आणि मिळवा 2 लाख 54 हजार रुपये नफा
पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का नाही कसे तपासावे? असा अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आले आहेत का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन एन्ट्री करून तपासावे लागेल किंवा तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील तपासू शकता. ज्या शेतकऱ्यांना बँकेचे मेसेज येतात त्या शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्यानंतर मेसेज देखील येतो. किंवा तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादी तुमच्या नाव देखील तपासू शकता.
5 thoughts on “शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही?”