Beneficiary List: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले का नाही ये तपासण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर ही माहिती जाणून घेऊ शकता. तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे जमा झाले का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबद्दल जाणून घेऊया.
केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर योजना आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर प्रत्येक हप्त्याची स्थिती वेळेवर तपासणे खूप गरजेचे आहे. कारण अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे किंवा काही कागदपत्राच्या त्रुटीमुळे हप्ता अडकू शकतो. जर वेळेत ही चूक दुरुस्त केली तर पुढील हप्ते मिळण्यास काही अडचण येत नाही.
पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी येणार?
पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्ते जमा करण्यात आले आहे. यानंतर लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20 वा हप्ता जमा होणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँका त्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जमा होऊ शकतो. सरकारने याबाबत अजून कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पहावी. Beneficiary List
हे पण वाचा| महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं संकट; पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! या 11 जिल्ह्यांना हाय अलर्ट..
लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?
तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आहे का नाही ये तपासण्यासाठी तुम्हाला खाली स्टेप फॉलो करावे लागतील.
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादी (beneficiary list) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
- हे सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर दिसेल.
- या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे का नाही तपासू शकता.
जर तुमचे नाव यादीत नसेल तर काळजी करू नका अनेक वेळा छोट्याशा अडचणीमुळे तुमचे नाव दिसत नाही ज्या तुम्ही वेळे अगोदर दुरुस्त करू शकतात.
हप्त्याचे status कसे तपासावे? (Benefacer status)
- तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेजवर beneficiary status या पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकायचा आहे.
- यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो टाकून तुम्ही तुमच्या खात्याची माहिती तपासू शकतात.
- यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत किती मिळाले आहेत कोणता हप्ता किती तारखेला मिळाला आहे कोणत्या बँकेत जमा झाला आहे याची सर्व माहिती दिसेल.
- याशिवाय आधार पडताळणीची स्थिती बँक तपशील आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीची स्थिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल.
अनेक वेळा असे होते की तुम्ही अर्ज भरलेला असतो पण काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे अशा कारणामुळे तुमचे नाव यादीत नसते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन चुका दुरुस्त करू शकतात. Edit Aadhar faiture record किंवा update self registered former या पर्यायाचा वापर करून तुम्ही आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करू शकता.
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करणे शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील सीएसटी केंद्रामध्ये भेट देऊन तिथेच जाऊन दुरुस्ती करून घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बँक पासबुक आणि जमीन संबंधित आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. याशिवाय मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्याची स्थिती तपासणी सोपे होईल अशी आशा आहे.