बँक तुमचे काम करत नाही, टेन्शन घेऊ नका; RBI ने दिली खास सुविधा! अशाप्रकारे करू शकता त्यांची तक्रार..


Banking rules RBI: आजकालच्या धावपळीच्या जीवनात बँकिंग सेवा आपल्यासाठी खूप महत्त्वाची बनली आहे. बँका ते एटीएम व्यवहार कर्ज सुविधा अशा अनेक गोष्टीचा आपण दररोज वापर करत असतो. आपल्या देशातील सर्व बँका रिझल्ट बँक ऑफ इंडियाच्या कठोर नियमानुसार काम करत असतात. त्यामुळेच RBI ला बँकांची बँक असे म्हटले जाते. पण अनेक वेळा असे होते की बँका ग्राहकांना योग्य ती सेवा देत नाहीत त्यांच्या कामांना विनाकारण टाळले जाते कधी कधी एखादा पेमेंट अडकून राहतं किंवा वेळेवर होत नाही. अशा परिस्थितीत ग्राहक म्हणून आपण हतबल होऊन जातो आणि आपल्याला कळत नाही की नेमकं काय करावे. पण आता काळजी करायची गरज नाही कारण RBI ने तुमच्यासाठी एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जर तुमची बँक तुमचं काम करत नसेल किंवा तुम्हाला बँकेच्या सेवेबद्दल काही तक्रार असेल तर तुम्ही बँकिंग लोकपाल या प्रणालीचा उपयोग करून तुमची तक्रार नोंदवू शकता. RBI ने खास बँक ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही यंत्रणा उभारली आहे. बँकिंग लोकपाल कडे तुम्ही बँकेबद्दल आपली तक्रार नोंदवू शकता आणि आपल्या समस्येवर तोडगा काढू शकता. ही सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांची तक्रार देणे सोयीस्कर होते. विशेष म्हणजे बँकिंग लोकपाल तक्रार केल्यानंतर साधारणपणे 30 दिवसाच्या आत ग्राहकांच्या समस्येवर निराकरण केले जाते. ज्यामुळे तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण होते.Banking rules RBI

हे पण वाचा| 1 जुलैला सोन्याच्या किमतीत मोठा बदल! जाणून घ्या आजच्या 10 ग्राम सोन्याच्या किमती..

कोणती तक्रार तुम्ही करू शकता?

बँकिंग लोकपाल कडे तुम्ही अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा बद्दल तक्रारी नोंदवू शकता. यामध्ये खालील मुख्य समस्या आहेत.

  • जर तुमच्या बँक खात्यावर कोणताही योग्य कारण नसताना बंद करण्यात आले असेल तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकता.
  • कर्जावर जास्त व्याज आकारले जात असेल किंवा तुम्हाला चुकीच्या व्याजदराने परतावा मिळत असेल यावर तुम्ही तक्रार देऊ शकता.
  • एटीएम मधून पैसे न निघणे खात्यातून पैसे कट होणे पण पैसे न मिळणे किंवा इतर तांत्रिक अडचणी यासारख्या समस्यासाठी तक्रार नोंदवू शकता.
  • ऑनलाइन किंवा ऑफलाइन बँकिंग मध्ये येणाऱ्या अडचणी व्यवहारातील त्रुटी किंवा ॲप संबंधित समस्यावर तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता.
  • तुमचा चेक वेळेवर क्लिअर होत नसेल आणि यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
  • क्रेडिट कार्डच्या बिलात त्रुटी, अनधिकृत व्यवहार किंवा क्रेडिट कार्ड संबंधित इतर अडचणीसाठी बँकिंग लोकपालची मदत घेऊ शकता.
  • बँकेतील कर्मचारी तुमचा आदर करत नसतील योग्य प्रतिसाद देत नसतील किंवा तुम्हाला आवश्यक ती सेवा मिळत नसेल तर तुम्ही या सुविधेचा वापर करून तुमची तक्रार देऊ शकता.

हे पण वाचा| जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्या; जाणून घ्या नवीन गॅस सिलेंडरचे दर

तक्रार कशी करावी?

बँकिंग लोकपाल कडे तक्रार करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करावी लागतील.

  • सर्वात आधी तुम्हाला रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या तक्रार निवारण पोर्टलवर म्हणजेच http://cms.rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला file complaint (तक्रार दाखल करा) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक ऑनलाईन फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये तुम्हाला बँकेबद्दल संपूर्ण माहिती आणि तुमच्या तक्रारीचा तपशील काळजीपूर्वक करायचा आहे. सर्व माहिती अचूक आणि स्पष्टपणे भरणे महत्त्वाचे आहे.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • तुमची तक्रार यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक complaint reference number मिळेल. हा क्रमांक जपून ठेवा कारण या क्रमांकाचा वापर करून तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “बँक तुमचे काम करत नाही, टेन्शन घेऊ नका; RBI ने दिली खास सुविधा! अशाप्रकारे करू शकता त्यांची तक्रार..”

Leave a Comment

error: Content is protected !!