Banking News : नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आरबीआय ने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय एक जून पासून लागू होणार आहे. यामध्ये बँक खाते उघडणे किंवा बंद करणे, एटीएम वरून व्यवहार करणे, इथपासून ते चेक रिटर्न पर्यंत सर्व गोष्टी महाग पडणार आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नुकताच एक नवीन नियमावली जाहीर केली असून, थेट आपल्या खिशावर परिणाम करणारा निर्णय घेतलेला आहे. एक जून २०25 पासून हा नवीन नियम देशभर लागू होणार आहे. यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि आयसीआयसी सह सर्व बँककांमध्ये हे बदल पाहायला मिळणार आहेत. Banking News
पूर्वी आपल्याला वाटायचं की, बँकेत अकाउंट उघडलं की झालं, त्यावर काही खर्च येत नाही. पण आता आरबीआयच्या नव्या नियमानुसार, अकाउंट बंद करणे ही महाग झाला आहे. उदाहरणार्थ तुम्ही अकाउंट उघडल्यावर जर 14 दिवसाच्या आत ते बंद केलं, तर चालेल, काही शुल्क लागणार नाही. पण जर सहा महिन्याच्या आत ते बंद केले तर शंभर रुपये दंड भरावा लागेल. आणि सहा महिन्यानंतर बारा महिन्याच्या आत बंद केलं, तर तब्बल तीनशे रुपये द्यावे लागतील. एखाद्या गरजू व्यक्तीने तात्पुरता खाते उघडलं, गरज संपल्यावर ते बंद करायचं म्हंटले तर त्याला खर्च उचलावा लागणार आहे.
इतकंच नाही तर एखाद्याने दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले तर त्यालाही वाढीवशुल्क भरावा लागणार आहे. अगोदर फक्त मर्यादित व्यवहारावरच शुल्क लागू होता. पण आता 23 रुपये फक्त पैसे काढल्यावर आणि बारा रुपये बॅलन्स किंवा मिनी स्टेटमेंट बघितल्यावर लागणार आहे. म्हणजे शेतकरी किंवा मंजूर एखाद्या बांधवांनी लांब वरच्या बाजारात जाऊन पैसे काढतो, आणि तिथेच दुसऱ्या बँकेचे एटीएम असतं, त्यालाही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
चेक जर पाहून झाला तर ग्रामीण भागाचे सामान्य खातेदार किंवा जेष्ठ नागरिकांसाठी चारशे रुपये आणि इतर खात्यांसाठी तब्बल पाचशे रुपये शुल्क लागणार आहे. आधीच आपल्याकडे कधी कधी चुकून, चेक रिटर्न होतो, त्यात आता हा आर्थिक दंड भरावा लागतो, ही बाब नक्कीच चिंताजनक आहे.
या नियमात आणखी एक मोठा बदल म्हणजे कॅश ट्रांजेक्शन घालण्यात आलेली मर्यादा. म्हणजे आता महिन्याला फक्त पाच व्यवहार आणि पाच लाख रुपये पर्यंत मोफत राहणार आहे. त्यापुढे जर कोणीही या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले, तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी ₹1000 द्यावे लागणार आहेत. एखाद्या लघुउद्योग करणाऱ्या व्यापारी महिन्याला आठ दहा व्यवहार करत असेल, तर त्याला प्रत्येकी हजार रुपये म्हणजे महिन्याला हजारो रुपयांचा खर्च लागणार आहे.
या सगळ्या बदलांचा सर्वसामान्य जनतेवर आणि ग्रामीण भागातील नागरिकांवरती मोठा परिणाम होणार आहे. आजही आपल्या गावांमध्ये बँकिंग सुविधा सीमित आहे. एकच शाखा, मर्यादित कर्मचारी आणि लांब लांब वरची एटीएम मशीन. परिस्थिती जर प्रत्येक गोष्टीसाठी शुल्क वाढवलं, तर गरीब, मजूर, शेतकरी, महिला बचत गट सगळ्यांनाच आर्थिक फटका बसणार आहे.
शरद राहणाऱ्यांना डिजिटल व्यवहार सहज शक्य आहेत, पण आजही आपल्या गावात खूप लोकांना इंटरनेट नीट वापरता येत नाही. मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय ॲप्स वापर करून शंभर टक्के झाला नाही. त्यामुळे रोख व्यवहार करणारे ग्राहक हेच या नव्या नियमांचे मोठे बळी ठरणार आहेत.
हे पण वाचा | ATM NEWS | ATM मधून पैसे काढण्यासाठी एक एप्रिल पासून नवीन नियम होणार लागू, जाणुन घ्या सविस्तर माहिती
2 thoughts on “1 जुन पासून बँकांना हा नवीन नियम होणार लागू! सर्वसामान्यांना भरावा लागणार अतिरिक्त पैसे?”