Ayushman Card Yojana: केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गोरगरीब आणि गरजू कुटुंबातील सदस्यांना पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. या योजनेमुळे अनेक रुग्णांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या आजारावर उपचार करणे सोपे झाले आहे. मात्र आता या योजनेच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्याचा थेट परिणाम रुग्णांच्या खिशावर होणार आहे. Ayushman Card Yojana
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार आता काही विशिष्ट आजारावरील उपचार फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच मोफत उपलब्ध असणार आहेत. यापूर्वी खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत होणारे उपचार आता तिथे पैसे देऊन करावे लागणार आहेत. नवीन नियमानुसार मेंदूचे आजार, प्रस्तुती आणि गर्भाशयाशी संबंधित शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांसाठी आपणास रुग्णांना फक्त सरकारी दवाखान्यांमध्येच जावे लागणार आहे. खाजगी रुग्णालयामध्ये या उपचारासाठी आता आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत मोफत उपचार केला जाणार नाही. त्यामुळे आजारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची सोय आता फक्त सरकारी रुग्णालयावर अवलंबून राहणार आहे.
नियम का बदलले?
पूर्वी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत एकूण 1760 आजारावर खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केला जात होता. परंतु आता काही आजारांना खाजगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळणार नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे जेणेकरून खाजगी रुग्णालयावरील खर्च कमी करता येईल आणि सरकारी सुविधा योग्य वापर होईल.
हे पण वाचा| श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोन्याच्या किमती वाढल्या की घसरल्या? जाणून घ्या सविस्तर
आयुष्यमान कार्ड कसे काढावे?
- तुमच्या मोबाईल मध्ये आयुष्यमान ॲप डाऊनलोड करा ॲप मध्ये लॉगिन करा बेनिफेसरी पर्याय निवडा.
- तुमच्या कुटुंबातील सदस्यांची यादी दिसेल ज्या सदस्याचे आयुष्यमान कार्ड तयार केले नाही त्याच्या नावापुढे ऑथेंटीकेट हा पर्याय दिसेल. ऑथेंटीकेट पर्यावर क्लिक करून आधार क्रमांक आणि ओटीपी टाका. त्यानंतर फोटो क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
- ई केवायसी पूर्ण झाल्यावर अर्ज सबमिट करा एका आठवड्यात व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुम्ही ॲप मधून आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोन नंबर
- रेशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो