Australia vs South Africa Match : प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका खेळपट्टी अहवाल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मंगळवारी रावळपिंडी येथे चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या सातव्या सामन्यामध्ये आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि तगडे खेळाडू दोन्ही संघाकडे आहेत. एकमेकांना विरुद्ध विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही मॅच प्रेक्षकांसाठी एक विशेष मॅच ठरणार आहे. यांच्यामधील लढाई पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत. Australia vs South Africa Match
Steve Smith च्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा पाच विकेटसह पराभव केलेला आहे. त्याचवेळी, Temba Bavuma यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान चा १०७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केलेला आहे. आता ग्रुप मध्ये नंबर एक होण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तगडी लढाई होणार आहे यानंतर उपांत फेरीचा मार्ग मोकळा होईल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दोघही संघ एक तगडे संघ आहेत. दोघांनाही चांगले माहित आहे की, हा सामना जिंकल्यास रूपांत फेरीतील स्थान जवळ निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही संघ हरायला आवडणार नाही. जर दोन्ही संघांनी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तर सामना रोमांचक होईल हे निश्चित आहे. तर समोर आलेल्या अहवालानुसार, रावळपिंडीच्या खेळपट्टीवरून कोणाला मदत होण्याची अपेक्षा आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उच्च स्कोरिंग सामन्यासाठी ओळखला जातो. येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. खेळपट्टी सपाट असण्याची शक्यता वर्तव्यता आहे आणि दोन्ही संघाकडे असलेल्या मजबूत खेळाडूंचा विचार करून येथे उच्च धावसंख्या असलेला सामना होऊ शकतो असं तज्ञांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा | India vs Pakistan Champion Trophy
तथापि, रावळपिंडीतील खेळ जसा जसा पुढे सरकतो तसा तसा खेळपट्टी मंद होत जाते. अशा परिस्थितीमध्ये फिरकीपटू फायदा घेऊ शकतात. रावळ पिंडीमध्ये झालेल्या अलीकडच्या एकदिवशीय सामन्यामध्ये मोठ्या धाव संख्येने लक्ष गाठले आहे. अशा परिस्थितीमध्ये जो संघ जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देणार आहे.
संघ माहिती
Australia Playing XI : ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ(C), मर्नस लाबूसेन, जोश इंग्लिश, अॅलेक्स केरी, Glenn Maxwell, बेन द्वारहुईस, नथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, ॲडम झांपा
South Africa Playing XI : तेंबा बावूमा ( C), रायन रिकेटलन, रॉसी व्हण डर ड्यूसेन, एडम मार्करम, हेनरीक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्क्रो जॉनसेन, वियान मूल्डर, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी
(वर दिलेली माहिती इंटरनेट द्वारे गोळा केलेली आहे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित प्लॅटफॉर्मचा वापर करा, वर दिलेल्या माहितीचा कुठलाही माहितीचा दावा करत नाही. )
1 thought on “Australia vs South Africa Match : AUS विरुद्ध SA होणार जोरदार लढत, जाणून घ्या खेळपट्टीवरून कोणाला होणार मदत”