1 मे पासून ATM साठी लागू होणार हा नवीन नियम, आता एटीएम वापरासाठी भरावे लागणार तुम्हाला एवढे पैसे!

ATM New Rules : देशभरात डिजिटल व्यवहारांची क्रांती होत असताना देखील, एटीएम चा वापर सध्या ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पण होत आहे. आज हि लोक त्यांच्या गरजेनुसार एटीएम वापरत आहेत. मात्र आता व्यवहार अतिरिक्त खर्च बसणार आहे. एक मे 2025 पासून एटीएम वापरणे नियम बदलणार असून, पैसे काढणे आणि बॅलन्स तपासणीही ग्राहकांच्या खिशाला चटका लावणार आहे. लवकरच या नियमामध्ये मोठा बदल होणार आहे. ATM New Rules

आरबीआय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हे नविन नियम लागू होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास किंवा बॅलन्स तपासल्यास लागणारा चार्ज.

पैसे काढने आधीक होणार महाग!

यापूर्वी, ठरवून दिलेल्या मोफत व्यवहारानंतर जर ग्राहकांनी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले, तर त्याला सतरा रुपये शुल्क द्यावे लागणार. मात्र आता हे शुल्क १९ रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजे आता यावेळेस एटीएम वापरणाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. ग्राहकांमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

फक्त पैसेच काढणे नव्हे, तर बॅलन्स चेक करण्यासाठी आता अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. या आधी हा चार्ज सात रुपये होता, जो आता वाढवून नऊ रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजे एका छोट्याशा व्यवहारासाठी आता ग्राहकाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

मोफत व्यवहारांची मर्यादा काय आहे?

मेट्रो शहरांमध्ये पाच मोफत व्यवहार, नॉन मेट्रो शहरांमध्ये तीन मोफत व्यवहार या मर्यादा पेक्षा जास्त व्यवहार झाल्यास वरील प्रमाणे शुल्क लागू होईल. त्यामुळे एटीएम चा वापर करताना याची विशेषता नोंद घेणे गरजेचे आहे.

NPCI ने आरबीआय समोर एक प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये एटीएम ऑपरेटर व वाईट लेबल एटीएम कंपन्यांनी सांगितले की, त्यांचे मेंटेनन्स ऑपरेशन खर्च वाढले आहेत. त्यामुळे इंटरचेंज FEE वाढवणे आवश्यक आहे. आरबीआयने ही बाब मान्य करत एक मे पासुन हे बदल लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

ATM व्यवहारांवर होणाऱ्या वाढीव खर्चामुळे, ग्राहकांनी आता स्वतःच आर्थिक नियोजन समजून वापर करण गरजेचं आहे. शक्यतो आपल्या बँकेच्या एटीएम चा वापर करावा. जिथे शक्य असेल तिथे UPI, नेट बँकिंग, किंवा मोबाईल वॉलेटचा वापर केल्यास व्यवहार विनाचार्ज होणार आहेत.

डिजिटल व्यवहारांची गरज आता अधिक आहे

भारत सरकारने आणि भारतीय रिझर्व बँकेने गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट्सला चालना दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये, या नियमानमुळे अधिकाधिक लोक डिजिटल व्यवहारांकडे वळतील, असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत. बँकेच्या रांगेत थांबण्याऐवजी स्मार्टफोनवरून फक्त काही सेकंदात व्यवहार करणे ही काळाची गरज बनली आहे.

नवीन नियमांमुळे ग्राहकांना स्वतःच्या बँकिंग व्यवहारांचं नियोजन करणे अनिवार्य झाले आहे. दरवेळी दुसऱ्या बँकेच्या एटीएम चा वापर करणे ऐवजी आपल्या बँकेच्या जवळच्या एकदम चा वापर करावा. तसेच, बॅलन्स बघण्यासाठी बँकेच्या ॲपचा किंवा नेट बँकिंग चा वापर केल्यास चार्ज टाळता येईल.

हे पण वाचा | ATM Card News | ATM वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! आरबीआय नी घेतला मोठा निर्णय? वाचा सविस्तर माहिती

1 thought on “1 मे पासून ATM साठी लागू होणार हा नवीन नियम, आता एटीएम वापरासाठी भरावे लागणार तुम्हाला एवढे पैसे!”

Leave a Comment

error: Content is protected !!