एटीएम कार्ड वापरताय, तरी बातमी नक्की वाचा, आता एटीएम कार्ड वापरावरती नवीन नियम लागू!


ATM card new rules : डिजिटल व्यवहारांसोबत आपण कधी कधी एटीएम ने देखील व्यवहार करत असतो. एखाद्या गरजेच्या क्षणी एटीएम कार्ड घरातच विसरत, मग प्रश्न पडतो, अरे आपण तर ATM आणलं नाही ते घरीच राहिलं. आणि तुम्हाला तर एटीएम मध्ये पैशांची गरज असते. मग बँकेच्या लाईनीमध्ये ताटकळत बसावं लागतं. पण भाऊ, आता काळ बदलतोय… मोबाईल मध्ये असलेला UPI ॲप्स आता आपलं कार्ड बनणार आहे! होय, बँक आता अशा सोपी सेवा देत आहे की कार्डविना म्हणजे  कार्डलेस  कॅश विड्रॉल करून सहज पैसे मिळणार आहेत. ATM card new rules

आज आपण शहरी असो किंवा ग्रामीण सगळ्या लोकांच आयुष्य आता मोबाईलवर येऊन ठेपले. गुगल पे, फोन पे, पेटीएम सारखे ॲप्सने आता व्यवहार करणे इतकं सोपं केलं की, अगदी गावातल्या म्हातार माणसापासून ते शहरातल्या तरुणांपर्यंत सगळे त्याचा वापर करत आहेत. आणि आता या यूपीआयच्या मदतीने आपण थेट एटीएम मधून कार्ड शिवाय पैसे काढू शकतो हे ऐकून सगळे थक्क झाले आहेत.

कस करायचं?

भाऊ, ही पद्धत अगदी सोपी आहे. फक्त तुमचं UPI ॲप मोबाईल मध्ये ऍक्टिव्ह असला पाहिजे. तुम्ही एटीएम मशीन पाशी गेला की, तिथं UPI CASH विड्रॉल असा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक केलं की एक QR कोड  स्क्रीनवर येतो. मग फक्त तुमच्या फोन मधून तो QR कोड स्कॅन करा, रक्कम टाका, आणि तुमचा UPI पिन टाका. बस! काही क्षणातच तुम्हाला तुमची रोख रक्कम मिळेल. ना कार्ड हरवल्याची चिंता, ना पिन दुसऱ्याला कळल्याची भीती सर्व सुरक्षित आणि सोप.

काही गोष्टी लक्षात ठेवा..

या सोयीचा लाभ घेण्यासाठी तुमचं UPI ॲप मोबाईल्स मध्ये ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि ही सेवा सध्या फक्त काही बँकांच्या एटीएम मध्ये सुरू आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे, तिथेच पैसे काढता येतील. यामध्ये एकावेळी किमान ₹5000 ते ₹10,000 रुपयांची रोख रक्कम काढता येते, आणि दिवसभरामध्ये ₹20,000 रुपयांपर्यंत मर्यादा असते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. कारण यात तुमचं कार्ड वापरले जात नाही, आणि पिन फक्त तुमच्या मोबाईल मध्ये टाकायचा असतो.

ही सुविधा म्हणजे खरंतर डिजिटल इंडियाच गावागावातलं रूप. आता तुम्ही लांबच्या प्रवासाला गेलात, अचानक पैसे संपले, कार्ड हरवले तरीसुद्धा घाबरण्याचं कारण नाही. कारण तुमचा मोबाईल आणि तुमचं UPI हे तुमचा आता नवीन डिजिटल बँक कार्ड बनणार आहे.

हे पण वाचा | UPI New Rules | फोन पे, गुगल पे वापरत असाल, तर आता पासून हे नवीन नियम लागू वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!