Astrology Today News | १३ जुलै २०२५ पासून शनी महाराज वक्री चाल सुरू करणार आहेत आणि त्यामुळे काही राशींना खूप जपून चालावं लागणार आहे. शनी म्हणजे कर्माचे न्यायाधीश. ज्याच्या कर्मात चूक, त्याला शिक्षा आणि ज्याचं आचरण शुद्ध, त्याला थेट वरदान! पण जेव्हा शनी वक्री होतो, तेव्हा चांगल्या लोकांचं सुद्धा परीक्षा घेणं सुरू होतं. Astrology Today News
यंदाच्या श्रावणात १३ जुलैपासून शनी वक्री होणार असून, मेष, मिथुन, सिंह आणि धनु या चार राशींवर संकटांची मालिका सुरू होणार आहे. या काळात सावध पावलं टाकणं आणि संयम राखणं हाच उपाय आहे.
मेष राशी : आर्थिक कोंडी आणि कामावर अडथळे
मेष राशीच्या जातकांनी आर्थिक घडामोडींमध्ये विशेष सतर्कता ठेवावी. खर्च अचानक वाढतील. नोकरीमध्ये राजकारण, चहूबाजूंनी टोमणे अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. काहींच्या हातातलं काम अचानक दुसऱ्याला दिलं जाईल. यामुळे मनात राग येईल, पण शांती राखा.
मिथुन राशी : मेहनत वाया, घरात तणाव
या राशीच्या लोकांसाठी शनी वक्री काळ म्हणजे कठीण परीक्षा. सगळं काही करूनसुद्धा मेहनतीला योग्य फळ मिळणार नाही. घरात छोट्या कारणावरून वाद होतील. घरातल्या वडीलधाऱ्यांची नाराजी, लहानग्यांची चिडचिड मानसिक शांतता हरवून जाईल. काही दिवस कोणताही मोठा निर्णय टाळावा.
सिंह राशी : अपघात, प्रवास आणि तणावाचं वातावरण
शनी सिंह राशीच्या अष्टम स्थानातून वक्री होत असल्याने या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. अनपेक्षित अपघात, वाहन खरेदीमध्ये गडबड, प्रवासात त्रास यांचा धोका आहे. घरातही तणाव वाढेल. प्रवास करावा लागल्यास सावध रहा. सणवारात किंवा महत्वाच्या प्रसंगात सहभागी होताना काळजी घ्या.
धनु राशी : चुकीचे निर्णय, वाद आणि अडचणी
धनु राशीच्या लोकांनी कोणतीही जोखीम टाळावी. नव्या व्यवहारात पैसे गुंतवताना दोनदा विचार करा. कोणी तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवू शकतो. वाणीवर ताबा ठेवा. एखाद्या गैरसमजातून चांगले संबंध तुटण्याची शक्यता आहे. सरकारी कामकाजात काळजी घ्या.
disclaimer : वरील दिलेली माहिती फक्त, वाचकांसाठी बनवलेले आहे. याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही