Astrology Today News : २०२५ सालचा जून महिना सुरू झाला असला तरी अनेक राशींसाठी पुढचा काळ फारसा सुखद नाही, असं स्पष्टपणे सांगावं लागेल. ज्योतिषशास्त्रात ‘षडाष्टक योग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशेष ग्रहस्थितीचा प्रभाव यंदा २० जूनपासून जाणवायला सुरुवात होणार आहे. मंगळ आणि शनी हे दोन बलाढ्य ग्रह जेव्हा एकमेकांपासून अडीच राशी अंतरावर म्हणजेच १५० अंशांवर येतात, तेव्हा जो योग निर्माण होतो, त्याला ‘षडाष्टक’ योग असं म्हटलं जातं.Astrology Today News
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा योग निर्माण झाला की काही विशिष्ट राशींवर दुःख, अपयश, आरोग्य समस्या, मानसिक अस्वस्थता, आर्थिक संकट अशा अनेक समस्या डोकं वर काढतात. यंदा हे सगळं ज्यांच्यावर होणार आहे त्या राशी म्हणजे तूळ, मकर आणि कर्क. चला तर पाहूया या राशींवर कसा परिणाम होणार आहे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
तूळ रास संयम, सावधगिरी आणि आर्थिक शिस्त अत्यावश्यक!
तूळ राशीच्या लोकांसाठी २० जूनपासून सुरू होणारा हा कालखंड मन:शांतीसाठी परीक्षा ठरणार आहे. एकीकडे मानसिक अस्थिरता जाणवेल, तर दुसरीकडे आर्थिक बाजू पूर्णपणे डगमगू शकते. अनेकांकडे मागितलेले पैसे परत मिळणार नाहीत, तर कुणाचं उधारीत चाललेलं व्यवहार संकटात येईल.
काही जणांना जुना आजार पुन्हा डोकं वर काढेल. दवाखाना, चाचण्या आणि औषधं यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ म्हणजे “कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि कोणतीही नवी गुंतवणूक टाळायची!” हा मंत्र लक्षात ठेवणं महत्त्वाचं. नोकरी असो वा व्यवसाय निर्णय विचारपूर्वक घ्या आणि कोणत्याही घाईगडबडीत वागू नका.
मकर रास – शनी-मंगळाची कटकट; तणाव, वाद आणि अपघातापासून सावध!
मकर राशीच्या लोकांसाठी हे दिवस म्हणजे संकटाचा कालखंड. विशेषतः वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. जोडीदाराशी कुरबुरी, गैरसमज, वाद-विवाद हे सगळं जवळून येऊन बसणार आहे. नात्यात दुरावा निर्माण होऊ नये यासाठी संयम पाळणं अत्यावश्यक आहे.
कार्यक्षेत्रातही अडथळे येतील. एरवी शांतपणे काम करणाऱ्यांनाही बॉसच्या कुरकुरेला सामोरं जावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे वाहन चालवताना अतिशय काळजी घ्या. एखादं छोटीशी चूक मोठा अपघात घडवू शकते. मित्रपरिवारात वाद होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं हाच खरा उपाय!
कर्क रास – खर्च, तणाव आणि वाद-विवाद टाळा, नाहीतर नुकसान अटळ!
कर्क राशीचे लोक या काळात आर्थिकदृष्ट्या फार अस्वस्थ राहतील. घरात खर्च वाढेल, आणि उत्पन्न मात्र स्थिर राहिल. त्यामुळे बजेट बिघडण्याची शक्यता प्रबळ आहे. नोकरीत काही चुकल्यास बॉसची नाराजी ओढवू शकते. त्यामुळे प्रत्येक काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक करू नका, कारण यातून आपल्याला अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. काहींना कोर्टकचेऱ्यांचे किंवा सरकारी कामकाजात विलंब होऊ शकतो. त्यामुळे संयम आणि काळजीपूर्वक प्रत्येक पाऊल टाकणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे “वाणीवर नियंत्रण ठेवा.” कारण शब्दांचं भांडार थोडंसं चुकलं तरी वाद ओढवू शकतात.
हे पण वाचा | राशिभविष्य: आज या राशीसाठी शुभ संकेत; होणार आर्थिक फायदा! जाणून घ्या सविस्तर माहिती
(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसारमाध्यम वाचकांसाठी बनवलेले आहे याबाबत कुठलाही आम्ही दावा करत नाही)