आज गजकेसरी योगाचा जबरदस्त प्रभाव; मिथुनसह ‘या’ ५ राशींना लागणार पैसा, प्रतिष्ठा, प्रगतीची लॉटरी

Astrology Today : श्रावण जवळ आला आणि नशिबाचे दरवाजे उघडायला सुरुवात झाली. आजचा दिवस म्हणजे ९ जुलै २०२५, हा एकदम शुभ संयोगांनी भरलेला आहे. गजकेसरी योग नावाचा अत्यंत शुभ योग आज जुळून आला असून त्यात चंद्र धनु राशीत संचार करतोय आणि बुधग्रहाचीही साथ आहे. अशा योगात पैसा, प्रतिष्ठा, नोकरी, व्यवहार, सौख्य, सन्मान सगळं काही तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहतं पण त्यासाठी तुमची राशी यामध्ये हवी. आज ५ राशींना या गजकेसरी योगाचा जबरदस्त फायदा मिळणार आहे. चला बघूयात, कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. Astrology Today

मेष राशी : मनात नको तेवढा आत्मविश्वास, नशिबाची साथ सगळ्यात भारी!

आज तुमचं नशिब पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहे. जर काही दिवसांपासून कामात अडथळे येत होते, तर आज अचानक गती येईल. लांबचा प्रवास करत असाल तर तो लाभदायक ठरेल. व्यवसायात नवे करार होतील. सरकारी कामात अडलेल्या फायली हलतील. सासरकडून किंवा वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही चांगली बातमी येऊ शकते.

मिथुन राशी : गोड बोलायची कला आज फळाला येईल, पैसा आणि मानसन्मान दोन्ही मिळणार!

आज तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कामात सहभागी होऊ शकता. मनात चांगल्या विचारांचा प्रवाह असेल. जुने गैरसमज दूर होतील. व्यवसायाच्या जागेची पूजाविधी किंवा नव्या योजनेची सुरुवात करायची असेल तर आज योग्य वेळ आहे. कोणताही द्वेष मनात ठेवू नका मन मोकळं ठेवा आणि आजची ऊर्जा फक्त सकारात्मकतेत वळवा.

सिंह राशी: गजराजाचा आशीर्वाद, आज बुद्धिमत्ता चमकणार!

तुमचं व्यक्तिमत्त्व आज खुलून येईल. समाजात तुमचं मत विचारात घेतलं जाईल. विद्यार्थ्यांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी हा दिवस विशेष आहे. पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या, किंवा मोठं प्रोजेक्ट मिळण्याचे संकेत आहेत. गुरुवर्य गणपती आणि चंद्राच्या या योगामुळे बौद्धिक प्रगतीचं दार उघडलं आहे. हा दिवस उपयोगात घ्या.

धनु राशी : चंद्र तुम्हालाच भेटायला आलाय, आता काळ पालटणार!

आज चंद्राची कृपा तुमच्यावर पूर्ण ताकदीने आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल. जुनं कर्ज फेडण्याची संधी मिळेल. गरजूंना मदतीचा हात द्या नशिब तुम्हाला अजून दुप्पट परतफेड करेल. नोकरीत मोठं काम मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन वाटा उघडतील. मुलांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल, त्यांचं यश तुमचं हसू खुलवेल.

कुंभ राशी : घरात धनप्राप्तीचे ढग जमलेत, आज पैसा आणि प्रमोशन दोन्ही तुमचं!

तुमचं घर सणासारखं भासेल. घरातले मोठे निर्णय तुमच्या बाजूने जातील. नोकरीत बढती, व्यवसायात नवीन पार्टनरशीप, आणि सामाजिक प्रतिष्ठा सगळं काही मिळेल. मित्रांची साथ मिळेल आणि तुमचं नेटवर्किंग फळ देईल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक पैसे हातात येतील.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती केवळ वाचकांसाठी बनवली आहे. याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही व अंधश्रद्धेला कुठलाही दुजारा देत नाही.)

हे पण वाचा | ३० जूनपासून ‘या’ राशींवर येणार मोठं संकट! हा त्रास सहन करावा लागणार

Leave a Comment

error: Content is protected !!