Astrology 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीसाठी आजचा दिवस खूपच खास ठरणार आहे. ग्रहांचा संचार आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर ज्योतिष शास्त्र बारीक लक्ष ठेवत असते. ग्रहांच्या गतीनुसार अनेक योग आणि युती तयार होतात. त्याचा थेट परिणाम काही विशिष्ट राशींवर होतो. 2025 मध्ये असा एक दुर्मिळ योग तयार होत आहे. तब्बल तीस वर्षानंतर कुंभ राशीमध्ये सूर्य, शनि आणि बुध योग हे तीन ग्रह एकत्र येणार आहेत. आणि याचा तीन राशींना मोठा फायदा ठरणार आहे.Astrology 2025
फेब्रुवारीत विशेष ग्रहांची स्थिती
फेब्रुवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशी मधून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार ज्याला कुंभ संक्राती म्हणतात. कुंभ राशीवर आधीच शनिदेव उपस्थित आहेत. व या राशींचा स्वामी देखील शनि आहे. त्यामुळे सूर्य आणि शनी या पिता-पुत्राची एकत्रीकरण घडणार आहे. विशेष म्हणजे, बुध ग्रह देखील कुंभ राशीत असेल, त्यामुळे कुंभ राशी त्रीग्रह योग निर्माण होणार आहे.
शनि हा संत गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह असल्याने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यास तब्बल 30 वर्षे लागतात. त्यामुळे कुंभ राशीत अशी युती पुन्हा तीस वर्षांनी होईल. या विशेष स्थितीचा तीन राशींना मोठा लाभ होणार आहे.
हे पण वाचा | Astrology Today: अरे बापरे या 6 राशींचे भाग्य उजळले, होणार मोठा आर्थिक लाभ
या राशींचा होणार मोठा फायदा
मेष
- मेष राशींच्या लोकांसाठी एक मोठा आर्थिक लाभ होणार त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची मोठी संधी आहे. कार्यक्षेत्रात मोठे यश मिळू नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता नोकरीच्या शोधत असणाऱ्या लोकांसाठी चांगली संधी उपलब्ध होणार पूर्वी केलेल्या गुंतवणुकातून मोठा आर्थिक लाभ समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि वडिलांची मदत काही महत्त्वाच्या कामांमधून मिळू शकते.
मिथुन
- मिथुन राशींच्या नवव्या स्थानात हि त्रिग्रही युती योग्य होत नववा आत्मविश्वास निर्माण व यश मिळण्यासाठी थोडेसे परिश्रम घ्यावे लागेल. पण, त्याचे चांगले परिणाम देखील दिसून येणार आहेत. अडकलेली कामे पूर्ण होतील. मानसिक तणाव कमी होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि भाग्याची साथ लाभेल.
धनु
धनु राशीच्या तिसऱ्या स्थानात सूर्य, शनी आणि बुध यांची युती होत आहे. त्यामुळे जातक धाडसी निर्णय घेण्यास सक्षम होतील. व्यवसाय किंवा नोकरीसाठी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. आर्थिक कोंडी दूर होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा उत्तम काळ आहे.
महत्त्वाची सूचना
ग्रहांच्या हालचालीचा प्रभाव राशींवर असतो, पण प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते. म्हणूनच राशी फलावर प्रभाव व्यक्तीगणीक बदलू कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ज्योतिसांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer : वरील माहिती विविध स्त्रोतर वरती आधारित असून, यातून कोणताही अंधश्रद्धेला पाठिंबा दिलेला नाही. ज्योतिष शास्त्राच्या विश्लेषण बाबत प्रत्येक स्वतःची वेगळी भूमिका असू शकते.)
2 thoughts on “Astrology 2025: 30 वर्षानंतर या ग्रहांची युती; या राशींना मिळणार मोठा लाभ!”