Antyodaya Ration Card News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने होळीनिमित्त राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महिलांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शासनाने महिलांना होळीनिमित्त मोफत साडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. व ही साडी कोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी कुठे अर्ज करायचा संपूर्ण माहिती या लेखामध्ये आहे त्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तरपणे वाचा. Antyodaya Ration Card News
महायुती सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी एसटी बस प्रवासात अर्ध टिकीट योजना लागू केली होती. त्यानंतर महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत खात्यावरती दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने होईन निमित्त राज्यातील महिलांना मोफत साडी वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साडी वाटप
राज्याच्या पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे साड्यांचे गठे तयार करण्यात आलेल्या आहेत. या साड्या प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. होळी पूर्वी सर्व लाभार्थ्या महिलांना एक साडी मिळणार आहे. यामुळे महिलांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु यापूर्वीही अशीच एक योजना राबवली होती. त्यामध्ये अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत की महिलांना खराब साड्या दिलेले आहेत. त्यामुळे महिलांनी योग्य साडी तपासून घेणे गरजेचे आहे कुठलीही खराबी आढळल्यास पुरवठा विभागाकडे तक्रार करा.
हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र
साडी कशी मिळणार ?
- लाभार्थी महिलांनी आपल्या रेशन दुकानात जाऊन ई- पास मशीनवर अंगठ्याची पडताळणी करावी लागणार आहे.
- पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कार्डवर एक साडी वितरित केली जाणार आहे.
- ही योजना सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील 1.35 लाख महिलांना मिळणार लाभ
खरंतर जळगाव जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या मोठी असल्याचे पाहायला मिळत आहे, जळगाव जिल्ह्यातील जवळपास एक लाख 35 हजार तीनशे दोन शिधापत्रिका धारकांना होळीनिमित्त मोफत साडी मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन कार्ड दुकानांमध्ये साड्या उपलब्ध करून देण्याचे प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले आहे
होळीपूर्वी महिलांना मिळणार साड्या
राज्य शासनाच्या माध्यमातून होळीनिमित्त महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ही साडी महिलांना होळीच्या पूर्वी मिळणार आहे. परंतु महिला या साडी वाटप योजनेमुळे आनंदी असल्या तरी साड्याच्या गुणोत्तेबाबत चिंता व्यक्त होत आहे. महिलांना चांगले दर्जाच्या आणि त्यांच्या आवडीच्या साड्या मिळतील का? एकाच प्रकारच्या साड्या मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
माहिती सरकारने घेतलेला निर्णय हा एक मोठा दिलासा आहे. होळीचा सणाचा उद्दिष्ट साधून महिलांना साडी वाटपाचा निर्णय घेतल्यामुळे महिलांमध्ये आणखी एक आनंद झळकणार आहे. तसेच नवनवीन माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट घेत चला जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकर अपडेट मिळेल.