Anganwadi Bharti Avashyak Kagat Patre | राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे तुम्ही देखील नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक बातमी महत्त्वाची ठरणार आहे. महिला व बालविकास विभागामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. बारावी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी आली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि परवेशिका पदांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भरती सुरू करण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागाने ही भरती प्रक्रिया हाती घेतलेली असून रिक्त पदे लवकरच भरले जाणार आहेत. Anganwadi Bharti Avashyak Kagat Patre
शंभर दिवसांमध्ये रिक्त पदे भरण्याचे आदेश
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी येता शंभर दिवसांमध्ये अंगणवाडीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी एक उत्तम संधी असणार आहे यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता हे जाणून घेण्यासाठी खालील प्रकारे माहिती वाचा.
अंगणवाडी मध्ये कोणत्या पदांसाठी भरती ?
- अंगणवाडी मदतनीस ( anganvadi madatnish)
- अंगणवाडी सेविका (anganvadi shevika )
- पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor)
अंगणवाडी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
- अंगणवाडी भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा.
- ऑक्टोबर 2022 नंतर भरती झालेल्या अंगणवाडी मदतनीस दहावी उत्तीर्ण असल्यास थेट सेविका पदी भरती मिळू शकते.
अंगणवाडी भरतीसाठी वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया
- अंगणवाडी भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे दरम्यान
- अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025
अंगणवाडी भरतीसाठी अर्जाची आवश्यक पात्रता
- अर्जदारांनी नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवासी असावे.
- रहिवासी असल्याचा पुरावा अर्थ सोबत जोडावा लागेल.
हे पण वाचा | महसूल व वन विभाग अंतर्गत भरती सुरू; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अंगणवाडी भरतीसाठी अर्ज कसा कराल
- संबंधित महिला व बालविकास कार्यालयात जाऊन अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करा.
- अंगणवाडी भरती मध्ये आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट फोटोसह पूर्ण अर्ज भरा.
- भरलेल्या अर्ज दिलेल्या पत्त्यावरती वेळेत सादर करा.
अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhar card)
- शिधापत्रिका (Ration card)
- जात प्रमाणपत्र (Caste certificate
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( Income certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र ( मुळगावचे रहिवासी असलेला दाखला )
- जर अर्जदार उमेदवारांनी दहावी पेक्षा जास्त शिक्षण घेतलेले असेल तर त्याचे प्रमाणपत्र.
जर तुम्ही देखील या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर वर दिलेले कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.
(नमस्कार, नवीन भरतीच्या माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.)
Please send any other pcmc sarkari jobs.
Angnvadi sevika