कोणाच्या नावावर किती जमीन आहे, फक्त एका क्लिकवर कळणार! या पद्धतीने पहा

Agriculture News : जर तुम्ही देखील एखाद शेत जमीन किंवा कुठे जागा खरेदी करीत असाल तर तुम्हाला देखील माहित असणे आवश्यक आहे कोणाच्या नावावर किती जमीन आहे व कुठे आहे परंतु तुम्ही कशा पद्धतीने चेक करणार हे अद्याप तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी अशीच एक माहिती घेऊन आलेलो आहोत त्या पद्धतीने तुम्ही चेक करून तुमचे पुढचे काम करू शकता. तुला तर जाणून घेऊ या सविस्तर माहिती. Agriculture News

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गावागावा शेतकरी आणि कष्टकरी माणूस आपापल्या कष्टातून पैशातून घर, जमीन, शेतजमीन, घेण्यासाठी आयुष्यभर श्रम करतो. कोणीतरी शेतासाठी कोणीतरी निवारासाठी कोणी भविष्यातील गुंतवणुकीसाठी म्हणून प्लॉट, बंगला, वाडा घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनेकदा काय होतं तुमच्या स्वप्नांची ही जमीन एका चुकीच्या माहितीने हातातून निसटते. अनेक उदाहरणं आपण पाहिलेले आहे. एका प्लॉटवर दोन दोन रजिस्ट्री झालेले असतात, आणि त्या अडकतो सामान्य माणूस. पैसा दिला तरी जमीन मिळत नाही, कोर्टाची झंझट, पोलीस स्टेशनची पाय धुळ, आणि शेवटी स्वप्नांचा चुरडा. आशा असंख्य घटना आजूबाजूला घडत असताना, सरकारनात एक मोठे पाऊल उचलला आहे. आता तुम्हाला कोणाच्या नावावर किती जमीन आहे, हे एका क्लिकवर मिळणार आहे.

एक गोष्ट सांगतो, सोलापूरच्या बबनरावाची गोष्ट आहे, मका पिकवणाऱ्या बबनरावने दोन वर्षाची बचत करून गावात एक एकर शिवार घेतला. पैसे दिले, व्यवहार केला, पण नंतर समजले की त्याच जमिनीवर आधीच एका इसमाचं नाव आहे. आता बबनराव कोर्ट कचेरा करत फिरतात, आणि पैशापासूनही गेले, जमिनी हातातून गेली. ही फसवणूक टाळण्यासाठी एकच मार्ग आहे जमिनीचा मालक कोण आहे, हे आधी तपासून पहा

पूर्वी यासाठी तलाठ्याकडे जावं लागायचं. आठवडाभर चकरा माराव्या लागायच्या, कुणी विचारत नसतं. पण आता, राज्याच्या महसूल विभागांना सगळा डेटा ऑनलाईन केलाय. म्हणजे, तुम्ही घरी बसून मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर जमिनीच्या मालकीची माहिती, खाते उतारा, भूलेख, भू नकाशा इत्यादी पाहू शकता. त्यामुळे कुठलीही जमीन घेण्यापूर्वी खात्री करता येते की ती जमीन खरोखर विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे का.

ही माहिती मिळवण्यासाठी प्रक्रिया फार सोपी आहे. सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महसुली विभागाचे अधिकृत वेबसाईटवर जा. आता तिथे तुमचा जिल्ह्याचे नाव निवडा, त्यानंतर तहसील आणि गाव निवडा. एकदा गावाचं नाव दिसलं की तिथे खातेदाराच्या नावाने शोधा हा पर्याय दिसेल. इथे जमिनीचा मालकाचे नाव पहिलं अक्षर टाका आणि सर्च करा.

यावर आधारित एक लिस्ट येईल, ज्यात त्या नावाशी संबंधित सर्व खातेदारांची नावे दिसतील. हवे असेल ते नाव निवडा, आणि Captcha कोड टाकून व्हेरिफाय करा. त्यानंतर स्क्रीनवर त्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या जमिनीची सगळी माहिती खाते क्रमांक, क्षेत्रफळ वगैरे दाखवेल.

ही माहिती तुम्ही व्यवहार आधी पाहिली तर कुठलेही फसवणुकीपासून वाचू शकता. अनेकांना याच महत्व व्यवहारानंतर कळत, पण त्यावेळी वेळ निघून गेली असते. म्हणूनच ही खबर दारी घ्यायला हवी.

हे पण वाचा| Solapur Unseasonal Rain | सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान! अनेक ठिकाणी मोठे नुकसान! तर एकाचा मृत्यू

Leave a Comment

error: Content is protected !!