Agriculture News | आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर वर्षानुवर्ष शेती करताना अचानक समजते की तो शेजारच्या नावावर गेली आणि आपला विश्वासच बसत नाही! आशा कितीतरी प्रकरणामध्ये गावात वाद, शिवीगाळ, कोर्ट कचऱ्या या गोष्टी सुरू होतात. पण तुम्ही भावनांच्या भरात न जाता, कायदेशीर मार्गाने न्याय मिळू शकता, तुमचा खरा हक्क शुद्ध करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया माहीत असणे गरजेचे आहे तरच तुम्ही योग्यरीत्या तुमची जमीन मिळू शकणार आहात.
सर्वात आधी हे काम करा
कोणतीही जमिनीवर कोणाची मालकी हक्क आहे हे पाहण्यासाठी सगळ्यात आधी सातबारा (7/12) आणि 8 अ उतारा पहावा लागतो. तुम्ही तुमच्या गावाच्या महसूल विभागात किंवा mahabhulekh.gov.in या पोर्टल वरून ऑनलाईन सातबारा काढू शकता.
जर त्यामध्ये तुमच्या ऐवजी दुसऱ्या शेतकऱ्याचे नाव दिसत असेल, तरी लगेच न घाबरता त्यानं ती जमीन कशी मिळवली खरेदी व्यवहारातून की वारसा हक्कातून? की काही फसवणुकीने?
तुमचा दावा असल्यास विवादित मालमत्ता म्हणून नोंद करा
जर तुम्हाला खात्री असेल की ही जमीन पूर्वी तुमच्या आजोबांच्या, वडिलांच्या नावावर होती आणि चुकीने शेजाऱ्याच्या नावावर गेली, तर थेट तहसील कार्यालयात जा आणि मुक्ताफळ फॉर्म भरून विवादित मालमत्ता म्हणून नोंदणी करा. तेव्हा तहसीलदार त्या जमिनीवर विवादित अशी नोंद करून कोणतीही नवीन खरेदी विक्री रोखतात आणि दोन्ही बाजूंची कागदपत्रे आणि साक्षीदार मागवले जातात.
शेजारच्याने ती जमीन कशी मिळवली? याचा शोध घ्या
खरेदी व्यवहार, सेल डिड आहे का? त्यावर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या सह्या आहेत का? वारसा हक्क त्यांच्या नावावर वारस नोंद आहे का? त्यात फसवणूक झालेली आहे का? कुणी तलाठी किंवा एजंट कडून खोटे कागदपत्र वापरून नाव चढवलं आहे का? जराशी फसवणूक झाली असेल तर फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येतो. भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468,471 अंतर्गत कारवाई करणे शक्य आहे.
महसूल न्यायालयात दावा दाखल करा – कायदेशीर लढा द्या
जय पुरावे तुमच्या बाजूने असतील तर Revenuel Court किंवा वरिष्ठ तहसीलदार कार्यालयात दावा दाखल करू शकता. तुमच्याकडे वडिलोपार्जित कागदपत्रे, उत्पन्नाचा पुरावा, शेजारच्यांच्या नोंदीत चूक असल्याचा पुरावा, साक्षीदार असावा लागतो. कोर्ट तुमचं म्हणणं ऐकून शेवटी तपासणीनंतर निर्णय घेतो. वेळ लागेल, पण जर तुमच्या दावा बरोबर असेल तर न्याय मिळणारच!
जर वाद सीमा रेषेचा असेल, म्हणजे शेजारच्या शेतकऱ्यांना काही फोटो जमिनीवर अतिक्रमण केला आहे. तर तलाठ्याकडून आणि मंडळाधिकारी कडून सीमे रेषेचं मोजमाप मागाव.
त्यासाठी तुम्ही भूमापनासाठी अर्ज करून सीमेरीषेचा पंचनामा, नकाशा व अहवाल मिळू शकतो. ही कोर्टात तुमच्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरवू शकता. यामध्ये तुम्ही सर्वात महत्वाचे म्हणजे शेजारच्या शेतकऱ्यांशी तोंडी वाट टाळा, यामुळे कोर्टात तुमची बाजू कमकुवत होऊ शकते. बिनधास्तपणे महसूल विभागाचा अर्ज दाखल करा, कोणत्याही बेकायदेशीर कब्जावर तुरंगात टाकण्याची तरतूद आहे.
हे पण वाचा | जमीन मोजणी प्रक्रियेत मोठा बदल; सरकारने केला हा नवीन नियम लागू?