राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती

Agriculture News: नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील एपीएल शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना मोफत रेशन ऐवजी रोख रक्कम देण्याची योजना आखली आहे. राज्य शासनाने या निर्णयास मंजुरी दिली आहे. यानुसार रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना रेशन ऐवजी थेट पैसे मिळणार आहेत.

या योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमहा एका लाभार्थ्यांना 150 रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या एपीएल शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम खात्यात जमा करण्याची योजनेअंतर्गत दिले जाणारी रक्कम प्रतिमहा प्रति लाभार्थी 170 रुपये अशी करण्यात आली आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही?

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पैसे?

या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांना तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना रेशन ऐवजी रोख पैसे दिल्या जाणार आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती महाडीबीटी द्वारे थेट पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. या उद्देशाने या योजनेच्या लेख शिर्षास मंजुरी देण्यात आलेले आहे.

दरम्यान राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये एपीएल शेतकरी डीबीटी योजनेसाठी अनिवार्य आहेत. या योजनेचा प्रस्तावामध्ये वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन लेक्चर्स उघडण्याची बाब शासनाच्या विचार आहे. त्यानुसार या निर्णयास शासनाने मान्यता दिली आहे. Agriculture News

हे पण वाचा | किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे 5 लाख रुपये कर्ज; अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..

राज्य शासनाच्या या निर्णयानुसार रेशन कार्डधारकांना आता रेशन दुकानातून धान्य खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी त्यांना महाडीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत. या निर्णयाचे उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून देणे आणि त्यांच्या गरज आणि अडचणीनुसार वस्तू खरेदी करता येतील. रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना थेट पैसे मिळवण्यासाठी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे. कारण शासन हे पैसे महाडीबीटी द्वारे ट्रान्सफर करणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. शेतकरी त्यांच्या गरजेनुसार पैसे खर्च शकतात. हे पैसे महाडीबीटी द्वारे देण्यात येणार आहे त्यामुळे यामध्ये पारदर्शकता निर्माण होत आहे. या निर्णयामुळे रेशन दुकानात जाण्याची गरज नाही वेळेची बचत होईल आणि आर्थिक फायदा देखील होईल. ज्या पद्धतीने प्रत्येक निर्णयाचे फायदे असतात त्याच प्रकारे त्याचे तोटे देखील असतात. हा शासन निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या अंमलबजावणी करणे कठीण होणार आहे. त्याचप्रकारे काही शेतकरी मिळालेला पैशाचा गैरवापर देखील करू शकतात.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार

या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही रेशन कार्यालयामध्ये जाऊन देखील याबद्दल माहिती मिळू शकतात. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्ड धारक असणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकरी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागत आहे. या अर्जाचा नमुना कुठे मिळेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या अर्जाचा नमुना देखील तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदाराकडेच मिळणार आहे. अर्जासोबत बँक पासबुकची झेरॉक्स रेशन कार्ड ची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स देणे आवश्यक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!