Agricultural Law : शेतात जायला रस्ता नाहीये? शेजारचा शेतकरी रस्ता देत नाही? तर चिंता नको! असा मिळवा हक्काचा रस्ता

Agricultural Law : तुमच्या शेतात जायला रस्ता नाहीये? आणि शेजारचा शेतकरी रस्ता देत नाही? तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे, तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने तुमचा हक्काचा रस्ता मिळू शकतात. अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे आम्ही आज या लेखांमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. Agricultural Law

अनेक वेळेस आपण जमिनी खरेदी करतो किंवा आपण आपल्या शेजारच्या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता मागतो. परंतु ते रस्ता देत नाही अशा परिस्थितीमध्ये वाद निर्माण होतो. परंतु चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही जमिनीच्या व्यवहारामध्ये कायदेशीर प्रक्रिया करू शकता. जर खरेदी केलेल्या जमिनीला रस्तात नसेल, तर खरेदीसाठी मोठ्या संकट निर्माण होते. अशा वेळेस जमिनीमध्ये स्पष्ट सीमारेषा व अधिकृत असताना असल्यामुळे भविष्यातील वापर अडचणीत येतो.

अनेकदा ए. ने प्लॉटला अधिकृत रस्ता दिला गेलेला असतो, परंतु प्रत्यक्षात त्या रस्त्याचा वापर थोडा केला जातो. म्हणजे 15 20 फुटाचा रस्ता अजून फक्त दहा फुटा पुरता वापर केला जातो. त्यामुळे खरेदी करताना या सर्व गोष्टी तपासणी आवश्यक असते. अन्यथा पुढे जाऊन अडचणी येतात.

असा मिळवा रस्ता

जर तुम्हाला तुमच्या जमिनीत जाण्यासाठी प्रत्यक्षात रस्ता नसेल, तर तुम्ही तहसीलदार यांना रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज करू शकता.

मालमत्तादार कोर्ट अॅक्टचे कलम 5(2) – जुन्या वहीवाटीचा रस्ता खुला करण्याचा अधिकार आहे.

तर महाराष्ट्र लँड रिन्यू कोड कलम 143- नवीन रस्ता मिळवण्यासाठी तहसीलदारांकडे अधिकृत मागणी करता येते.

या प्रक्रियेत स्थळीची पाहणी नकाशे उतारे आणि हरकती यांचा विचार केला जातो. शेजारील शेतकऱ्यांचा हरकती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जातो.

शासनाच्या नवीन नियमांचा शेतकऱ्यांना होणार फायदा

शासनाच्या माध्यमातून सध्या पांदण रस्ते, चारी व पाठाचे पाणी मार्ग खुले करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा रस्त्याचा प्रश्न मोकळा करून घेणे फायद्याचे ठरू शकते.

पुढे काय करावे?

जमीन खरेदीपूर्वी रस्त्याचे अस्तित्व आणि त्याचा वापर स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे तसेच जमिनीला अधिकृत रस्ता नसेल तर तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज करता येतो. कायद्याच्या आधारे तुम्हाला योग्य प्रकारे रस्ता मिळून शकतो. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करा.

हे पण वाचा | Maharashtra Weather News : पुढचे 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा; वाचा सविस्तर माहिती

1 thought on “Agricultural Law : शेतात जायला रस्ता नाहीये? शेजारचा शेतकरी रस्ता देत नाही? तर चिंता नको! असा मिळवा हक्काचा रस्ता”

Leave a Comment

error: Content is protected !!