आधार अपडेटसाठी नवीन नियम लागू! आता आधार अपडेट करण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे..

Aadhar Card New Rules: आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड केवळ एक ओळखपत्र म्हणून राहिले नाही तर ते आपल्या आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक अस्तित्वाचा मोठा भाग बनला आहे. त्यामुळे आता आधार कार्ड वरील कोणतीही चुकीची माहिती भविष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे UIDAI ने 2025 साठी आधार अपडेट संदर्भात नवीन आणि महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे त्यामुळे आधार मधील कोणताही बदल करण्यासाठी आता अधिक सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया करण्यात आली आहे.

या नवीन नियमामुळे फायदा केवळ भारतातील नागरिकांनाच नाही तर भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांना, पाच वर्षावरील लहान मुलं आणि दीर्घकालीन व्हिजा वर भारतात राहणाऱ्या व्यक्तींना देखील मिळणार आहे. समजा जर एखादा येणाऱ्या व्यक्तीला आपल्या मुलांसाठी आधार कार्ड बनवायचे असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर कोणी ग्रामीण भागात स्थापित होऊन आधारमध्ये बदल करू इच्छित असेल तर त्यांना आता नेमकी कोणती कागदपत्रे लागणार याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. Aadhar Card New Rules

कोणती कागदपत्रे आवश्यक?

आधार अपडेट करताना नागरिकांना अनेकदा कोणत्या माहितीसाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात असा प्रश्न पडतो. UIDAI ने आता ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. त्यांनी चार प्रमुख प्रकाराच्या कागदपत्राची यादी दिली आहे.

हे पण वाचा| सोन्या-चांदीच्या किमतीत आज मोठा बदल! जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याचे नवीन भाव..

  • ओळखीचा पुरावा: यामध्ये तुमचा पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, सरकारी ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड आणि फोटो असलेले पेन्शन कार्ड यासारखी अनेक कागदपत्रे वैध मानली आहेत.
  • पत्त्याचा पुरावा: पत्ता बदलण्यासाठी वीज पाणी किंवा गॅसचे मागील तीन महिन्याच्या आतील बिल, बँक पासबुक रेशन कार्ड नोंदणीकृत भाडे करार किंवा सरकारने दिलेली निवासा प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
  • जन्मतारखेचा पुरावा: यासाठी तुमचा पासपोर्ट, शालेय गुणपत्रक किंवा पेन्शन संबंधित कागदपत्रे वापरता येतील.
  • नातेसंबंधाचा पुरावा: कुटुंबातील सदस्यांच्या आधारासाठी हा पुरावा आवश्यक असतो.

मोफत ऑनलाईन अपडेटची सोय 2026 पर्यंत..

UIDAI ने नागरिकांना आणखीन एक मोठी दिलासा देणारे घोषणा केली आहे. ऑनलाइन आधार अपडेट प्रक्रिया 14 जून 2026 पर्यंत मोफत उपलब्ध राहणार आहे. याचा अर्थ तुम्ही घरबसल्या आपल्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर वरून आवश्यक स्कॅन केलेले कागदपत्रे अपलोड करून नाव पत्ता किंवा फोटो यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी अपडेट करू शकतात. ही प्रक्रिया ओटीपी किंवा बायोमेट्रिक पडताळणी द्वारे पूर्ण केली जाते आणि अपडेट झाल्यानंतर तुम्ही तुमचं ई आधार त्वरित डाऊनलोड करू शकता.

आजच्या काळात शाळा प्रवेशापासून ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बँक खाते उघडण्यापासून रेशन कार्ड मिळवण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक केले आहे. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड मध्ये कोणतेही चूक असल्यास तुम्हाला त्याचा मोठा परिणाम भोगाव लागू शकतो. UIDAI ने केलेले हे नवीन बदल नागरिकांना त्यांची ओळख अधिक चांगली आणि विश्वासाची बनवण्यासाठी एक उत्तम संधी देत आहे. जर तुमचा आधार कार्ड मध्ये काही त्रुटी असतील तर हीच योग्य वेळ आहे ती सुधारण्याची. या नवीन नियमामुळे आणि मोफत ऑनलाईन सुविधेमुळे आधार अपडेट करणे आता खूपच सोपं झाला आहे. त्यामुळे तुम्ही देखील या संधीचा लाभ घेऊन आपल्या आधार कार्ड त्वरित दुरुस्त करून घ्यावे कारण भविष्यात येणाऱ्या अडचणींना आळा बसेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!