आधार कार्ड चे फायदे काय आहेत? आधार कार्ड मुळे कोणत्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळेल; पहा सविस्तर..

Aadhar Card: शाळेत प्रवेश घेण्यापासून नोकरीला रुजू होण्यापर्यंत त्याचबरोबर बँकेतील कोणत्याही कामासाठी मोबाईल कार्डचे सिम कार्ड घेण्यासाठी किंवा अगदी ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी सुद्धा आधार कार्ड अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आता आधार कार्ड आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आपण आज या लेखांमधून आधार कार्ड संबंधित तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. प्रत्येकांच्या जीवनात आधार कार्ड चे महत्व काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड म्हणजे काय?

सर्वप्रथम आधार कार्ड म्हणजे काय हे जाणून घेऊया. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण द्वारे प्रदान केलेला बारा अंकी युनिक आधार क्रमांक आहे. आयरिस स्कॅन फिंगरप्रिंट आणि फोटो यासारख्या विविध माहितीच्या आधारावर आधार कार्ड तयार केले जाते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरनाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर आधार कार्ड ची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व आधार कार्ड UIDAI द्वारे जाहीर केले जातात. सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजना सवलती व शासकीय सेवांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट ठरत आहे. Aadhar Card

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस? जाणून घ्या तारीख सोबत यादी…

आधार कार्ड चे महत्व

जानेवारी 2009 मध्ये भारत सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ची स्थापना केली. या स्थापनेनंतर सप्टेंबर 2010 पासून आधार कार्ड बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा आणि अमित अग्रवाल सीईओ आहेत. आधार संदर्भात तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही आधार ग्राहक सेवा क्रमांक 1947 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आधार कार्ड ची वैधता अ जीवन आहे. आधार नोंदणी क्रमांकाची संख्या तीस हजार पेक्षा जास्त आहे आणि कार्ड नोंदणीची संख्या 138 कोटी वर्तवली जात आहे.

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..

आधार कार्ड चे फायदे

  • बँक खात्यामध्ये एलपीजी सबसिडी – पहल योजनेअंतर्गत तुमच्या सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट येण्यासाठी आधार कार्ड तुमच्या एलपीजी ग्राहक क्रमांक असे जोडलेले आहे.
  • जन धन योजना — आधार हा प्राथमिक कागदपत्र म्हणून ठेवून तुमचे प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडता येते. ज्यामध्ये रुपये कार्ड शून्य शिल्क बचत आणि विमा असे फायदे मिळतात.
  • दहा दिवसात पासपोर्ट— तुमची पोलीस पडताळणी पूर्ण करण्यापूर्वी आधार कार्ड मुळे फक्त दहा दिवसात तुम्हाला पासपोर्ट मिळू शकते.
  • डिजिटल लॉकर —तुमचा आधार डिजिलॉकर सिस्टमशी लिंक करून सरकारी सर्वर वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षितपणे ठेवता येतात.
  • मतदान कार्ड आधार सोबत लिंक —मतदार ओळखपत्राशी आधार लिंक केल्याने बोगस मतदान दूर करण्यास मदत होते आणि प्रति व्यक्ती एक मतदार ओळखपत्र सुनिश्चित होते.

हे पण वाचा| शेतकऱ्यांना पिक विम्याचा शेवटचा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाची अपडेट समोर..

आधार कार्ड वरील माहिती ऑनलाईन अपडेट कशी करावी?

जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड च्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुमची माहिती अपडेट करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या बोटांच्या ठशाद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने तुमच्या आधार कार्ड अपडेट करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “आधार कार्ड चे फायदे काय आहेत? आधार कार्ड मुळे कोणत्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळेल; पहा सविस्तर..”

Leave a Comment

error: Content is protected !!