IMD Weather Forecast News : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. हवामान अंदाज यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे शेती पिकांवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने त्यांच्या हवामान अंदाज मध्ये कोणती महत्त्वाची माहिती दिली ते आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. IMD Weather Forecast News
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील थंडी कमी होत असून तापमान वाढ होणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे हिवाळी पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
दक्षिण पश्चिम राजस्थान, ईशान्य आसाम आणि ईशान्य बांगलादेश या भागांमध्ये चक्रीवादळ सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यामुळे वाऱ्यांचा वेग ताशी 125 किमी पर्यंत पोहोचलेला आहे. या स्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश मध्ये पाऊस पडत आहे. IMD Weather Forecast News
स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार, अरुणाचल प्रदेश मध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. आसाम, सिक्कीम, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश मध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ज्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांचे व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पाईपलाईन अनुदान योजना सुरू; लगेच अर्ज करा
तसेच, महाराष्ट्र बाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही मात्र तापमानात थोडीशी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या हवामान अंदाज या बदलावर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या आवाहन करण्यात आलेले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोणताही बदल होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच शेतकरी बांधवांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांचे व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे आणि हा हवामान अंदाज तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल व नुकसान होण्यापासून मदत होईल.
बातमी स्त्रोत : ईथे क्लिक करून पहा
(अशाच हवामान अंदाज माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हवामान अंदाज माहिती लवकरात लवकर मिळेल.)
11 thoughts on “भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज”