लाडकी बहीण बहिण योजनेमध्ये मोठा घोटाळा? अंगणवाडी सेविकांचा विरोध!


Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली लाडकी बहिण योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तो म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांची अर्जाची पडताळणी होणार आहे परंतु याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. Ladki Bahin Yojana News

अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये योजना वादाच्या भवऱ्या मध्ये सापडलेली आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्याच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अंगणवाडी सेविका आणि सरकार यांच्या तणाव वाढत चाललेला आहे. अनेक सेविकांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ! ₹7,400 रुपयांची वाढ! जाणून घ्यायचे नवीन

अंगणवाडी सेविकांनी या पडताळणी प्रक्रियेवर आक्षेप घेत महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांचा दावा आहे की, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्या योजनेच्या सर्वेक्षणात सहभागी होणार नाहीत.

अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या

  • अंगणवाडी सेवकांनी काही सरकार पुढे प्रमुख मागण्या मांडलेल्या आहेत. यामध्ये प्रति सर्वेक्षण फॉर्म साठी पन्नास रुपये द्यावेत, कारण पडताळणीचे काम मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यासाठी वेळ व मेहनत आवश्यक आहे.
  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसेच ग्रॅज्युएटी आणि भत्ते वेळेवर द्यावेत. योजनेच्या कामासाठी वेगळा मोबदला मिळावा कारण हे त्यांच्यासाठी अतिरिक्त जबाबदारी आहे.
  • अंगणवाडी उघडण्याच्या वेळी एक सारखे ठेवाव्यात त्यामुळे सर्व सेविकांना समान सुविधा मिळतील.

आक्रमक आंदोलनाची तयारी

अमरावती मध्ये हजार अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन सरकारी विरोधामध्ये आंदोलन केलेली आहे. सेविकांनी रस्ता अडून आंदोलन करत सरकारला तीन मार्च पूर्वी मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा त्यांनी विधानसभा घेण्याचा इशारा देखील दिलेला आहे.

सरकार समोर मोठे आव्हान

लाडकी बहीण योजना हि महिलांसाठी मोठी संधी असून, आगामी निवडणुकीसाठी ती गेम चेंजर ठरणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेमुळे आणि अंगणवाडी सेविकांच्या तीव्र विरोधामुळे सरकार अडचणीत सापडले आहे.

समारोप :

या परिस्थितीमध्ये सरकारला तडजोडीचा मार्ग शोधावा लागणार आहे. एका बाजूला पात्र लाभार्थ्यांना बाहेर काढायचे आहे, तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण असे करणार? हा विषय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा बनला आहे, कारण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी वर महिलांचा विश्वास आणि आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी का आवश्यक?

राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, काही अपात्र महिलांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अर्जाचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत पात्रतेसाठी सरकारने काही महत्त्वाचे निकष केलेले आहेत.

  • ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे त्या महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत.
  • लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
  • शासनाने अपात्र लाभार्थ्यांना आपले अर्ज मागे घेण्याचे आवाहन केलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!