शेतकऱ्यांचे भन्नाट जुगाड! शेतकऱ्यांनी खर्च अन् वेळ वाचवण्यासाठी लावलं जबरदस्त डोकं ; VIDEO पाहून कौतुक कराल


Desi jugaad: शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे एक मोठा संघर्ष होय. कधी आर्थिक अडचणी, कधी कर्जाचे ओझं, तर कधी निसर्गाचा लहरीपणा, तर कधी मजुरांचा वाढता खर्च यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशामध्ये शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वतःच्या कल्पना कौशल्याचा वापर करून नवीन प्रयोग करत जबरदस्त जुगाड तयार केले आहे. या जुगाडाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्रातील एका तरुण शेतकऱ्याने तयार केलेल्या या जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोळगाव गावातील दत्ता सोनसाळे या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या बुद्धी आणि चातुर्याच्या आधारे सर्वांनाच थक्क केले आहे. या जुगडाचा व्हिडिओ फेसबुक वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दत्ताने शेतमजूर आणि वेळ वाचवण्यासाठी केलेला जबरदस्त जुगाड पाहायला मिळत आहे. हा देशी जुगाड शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही देखील वाचवत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी काय जुगाड केला आहे? तर दत्ताने चक्क आपल्या बैलजोडी सोबत वापरल्या जाणाऱ्या औतावर एक फवारणी पंप बसवला आहे.

याचा फायदा असा होतो की जेव्हा बैल जोडी शेतात नांगरणी करते त्याचवेळी कापसाचे पिकावर फवारणीचे कामही करता येते. यामुळे शेतमजुराची फवारणीसाठी लागणारी मजुरी वाचते आणि नांगरणी देखील होते. फवारणी आणि नांगरणी ही दोन्ही कामे एकाच वेळी पूर्ण होतात. ज्यामुळे मजुरी आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते. Desi jugaad

व्हिडिओ येथे पहा

नेटकऱ्याकडून कौतुकाचा वर्षाव

दत्ताचा हा अनोखा तुगड पाहून नेटकऱ्यांनीही त्याचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी छान डोकं लावलं, हुशार एकाच वेळी दोन काम केलीस, रॉयल शेतकरी, मुख्यमंत्र्यांना बोलवून भाऊला पुरस्कार द्यायला पाहिजे, खरोखरच खूप छान प्रयत्न आहे, जय जवान जय किसान, नंबर एक जुगाड अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. मात्र काही जणांनी बैलाच्या काळजी बद्दल देखील चिंता व्यक्त केली आहे. जसे की बैलांच्या अंगावर व पायावर जखम होऊ देऊ नका. बैलांची काळजी घ्या. शेतकरी भाऊ प्रयोग करा पण आपल्या जीवाला जपा बैलाला पण जपा अशा अनेक कमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्या आहेत.

या व्हिडिओतून एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्या शेतकऱ्यांमध्ये बुद्धिमत्ता आणि कल्पना करण्याचे कौशल्य खूप जास्त आहे. संकटावर मात करण्यासाठी आणि आपल्या कामात सुधारणा घडवण्यासाठी ते नेहमीच नवीन मार्ग शोधत असतात. आपल्या भारत देशातील नागरिक देशी जुगडासाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे जुगाड खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारे आहे. शेतकऱ्यांनाही अशाच नवनवीन प्रयोगातून उत्तमरीत्या शेती करावी आणि शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे अशी अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!