Horoscope Today 28 July 2025 | श्रावण महिना सुरु झालाय आणि आजचा दिवस म्हणजे या आध्यात्मिक कालखंडातील पहिलाच महत्त्वाचा सोमवार. पंचांगात मंगळ आणि चंद्राची युती झाल्यामुळे अनेक राशींवर वेगळा परिणाम दिसतोय. काही राशींसाठी आज नशिबाला गती येणारा आहे नवी प्रॉपर्टी, नवी संधी, नवे संबंध. पण काहींसाठी मात्र संवादात तणाव आणि अनिश्चिततेचं वातावरणही जाणवू शकतं. अशा वेळी कोणतं पाऊल उचलायचं, हे तुम्ही तुमच्या शहाणपणानं ठरवावं लागणार आहे. आजच्या राशीभविष्यात खास तुमच्यासाठी समजून घ्या नेमकं काय सांगतोय ग्रहांचा खेळ. Horoscope Today 28 July 2025
मेष : आजचा दिवस फार मोठं काही देणारा नसला, तरी छोट्या पावलांनी मोठ्या यशाकडे नेणारा ठरतोय. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत ओळखली जाईल, आणि वरिष्ठांच्या नजरेत विश्वास जागेल. आर्थिक बाजू तुलनेनं चांगली राहील. काही जुन्या गुंतवणुकीचा परतावा मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित काही बातमी तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेईल तुम्ही सजग राहिलात, तर नफा मिळेल. प्रेमसंबंधात मात्र संयम हाच उपाय. जास्त अपेक्षा आणि कमी संवाद या गोष्टी आज तणावाचं कारण ठरू शकतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडं वेळ घालवलं, तर नातं नव्यानं फुलू शकेल.
वृषभ : तुम्ही जितकं शांत राहाल, तितकं आज नशिबाचं चाक तुमच्यासाठी फिरणार आहे. आर्थिकदृष्ट्या स्थैर्याची पायरी आज बळकट होऊ शकते. कार्यालयात तुमचा शब्द मानला जाईल. पण प्रॉपर्टी किंवा मोठ्या व्यवहारात घाई करू नका हलकासा चुकीचा निर्णय तुमचं नुकसान करू शकतो. प्रेमात आज खास क्षण मिळतील, जोडीदार अचानक काहीतरी खास करणार सरप्राइज डेट किंवा घरात एखादा गोड क्षण. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष केलंत, तर आज डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो. घरातल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणं उपयोगी ठरेल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
हे पण वाचा | 144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार