Horoscope News : आज २६ जुलै २०२५, पहिलाच श्रावण शनिवार. सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच शांतता, देवघरातून उठणारी घंटानादांची भावना, आणि मनातल्या श्रद्धेचा जिवंत झरा. ग्रामीण भागात तर आजचे महत्त्व वेगळंच आहे. शेतकरी वाडीवस्तीपासून ते शहरातल्या प्रत्येक श्रद्धावान मनामध्ये आज शनिदेवांच्या कृपेची एक अनोखी आशा आहे. कारण यंदाचा श्रावण महिना सुरू होतोय दुर्लभ ग्रहयोगाने, त्यामुळे आजचा शनिवार केवळ धार्मिकच नाही तर नशिबाला चालना देणारा दिवशी ठरणार आहे. या दिवशी शनिदेव प्रसन्न होतात, विशेषतः काही निवडक राशींवर ज्यांचं नशीब पालटणार आहे. Horoscope News
मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार आर्थिकदृष्ट्या अनुकूल असला तरी घरगुती नातेसंबंधांमध्ये थोडासा तणाव जाणवू शकतो. कधी कधी बोलण्याच्या ओघात नात्यांमध्ये तडा जातो. त्यामुळे आज तुमचं एकेक वाक्य विचारपूर्वक बोलणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी नवी संधी, नवा प्रोजेक्ट, ज्यामुळे पुढील काही दिवसात प्रगतीचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, पण शांत संवादाने सर्व काही सुरळीत होईल. आज सकाळी काळ्या तीळांचं दान करा, शनिदेवांना तेल अर्पण करा. लाभ होईल.
वृषभ राशी : राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुटुंबाशी संवाद साधण्याचा आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मुद्दे प्रलंबित होते, ते आज चव्हाट्यावर येऊ शकतात. म्हणून निर्णय घेताना घाई नको, प्रत्येक गोष्ट सल्ला करून ठरवा. मोठ्या व्यवहारांपासून आज थोडं लांब राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुणाच्या भावना दुखावू नका, नाहीतर घरात तणाव वाढू शकतो. गरजू व्यक्तीला काळं कापड दान करा, फायदा होईल.
मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा भावनिक उलथापालथीचा आहे. दांपत्य जीवनात मतभेद, गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण लक्षात ठेवा गोंधळात आवाज वाढवण्यापेक्षा शांत बसून संवाद साधणंच खरं समाधान देईल. सौहार्दपूर्ण, वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही महत्त्वाचं स्थान पटकावाल. छोट्या गोष्टींवरून मोठं भांडण टाळा. शक्यतो दिवसभरात सहवासासाठी वेळ द्या. शनिदेवांना काळं वस्त्र अर्पण करा. काळं उडीद आणि तेलाचं दान करा.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
हे पण वाचा | 144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार