Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील लेकींना मिळणार 1 लाख रुपये! योजनेसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर..


Lek Ladki Yojana: महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत गरजेची योजना सुरू केली आहे. राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वकांशी योजना सुरू केली आहे. लेक लाडकी योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील कुटुंबासाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांचे शिक्षण आणि आरोग्य सुधारणे, बालविवाह रोखणे आणि त्यांच्या संगोपनाचा खर्च कमी करणे, त्यांना समाजात समान संधी उपलब्ध करून देणे.

एक एप्रिल 2023 पासून सुरू झालेल्या या योजनेत माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून मुलींना आर्थिक मदत दिली जाते. शी मदत मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये दिली जाते. ज्याची एकूण रक्कम 1 लाख 1000 एवढी आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळते आणि कुटुंबाला तिच्या पोषणासाठी आर्थिक आधार मिळतो. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी काय पात्रता आहे? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा| रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे कशी जोडावी? जाणून घ्या..

आवश्यक पात्रता

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत.

  • अर्जदाराकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
  • पालक महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांचे बँक खाते महाराष्ट्रातील असावे.
  • एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.
  • कुटुंबातील एक किंवा दोन मुली या योजनेसाठी पात्र आहेत जर कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तरीही मुलीला योजनेचा लाभ मिळेल.
  • दुसऱ्या आपत्तीसाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. जर दुसऱ्यांदा जुळी मुले झाली तरी त्यांना लाभ मिळेल. मात्र त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.

अर्ज कसा करावा?

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन प्रक्रिया आहेत यामध्ये तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया किंवा ऑफलाईन प्रक्रिया द्वारे अर्ज करू शकता.

ऑफलाइन प्रक्रिया: तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामीण किंवा नगरी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. मुलीचा जन्म नोंद झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा. Lek Ladki Yojana

ऑनलाइन अर्ज: या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील अगदी सोपी आहे. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका तर शहरी भागात अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका यांच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या तुमच्याकडून अर्ज घेऊन त्याची तपासणी करून पोर्टलवर अपलोड करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करतील. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मुलींना सुरक्षित आणि सन्मान जनक भविष्य मिळण्यास आधार मिळेल. ही योजना केवळ आर्थिक मदतच नाही तर मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची काम करते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!