Ration Card New Member Add: शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव जोडणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. जी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येते. तुम्हाला देखील तुमच्या शिधापत्रिकेमध्ये नवीन सदस्यांचे नाव नोंदवायचे आहे, तर त्याची सर्व प्रक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शिधापत्रिका ही अनेक सरकारी योजनेसाठी एक महत्त्वाचा कागदपत्र बनली आहे. त्यामुळे कुटुंबात नवीन सदस्य आल्यास त्याचे नाव शिधापत्रिका मध्ये जोडणे खूप आवश्यक बनले आहे.
शिधापत्रिकेमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडवायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल याचेच उत्तर आपण या लेखात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुटुंबात नवीन सदस्यांचे नाव जोडण्यासाठी अनेक कागदपत्रे लागतात जे तुम्ही आधीच तयार ठेवली तर तुमचा वेळ वाचेल. चला तर मग कोणती कागदपत्रे लागतात आणि ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज कसा करायचा याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आवश्यक कागदपत्रे
- शिधापत्रिका
- ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- नवीन सदस्याचे आधार कार्ड
- मोबाईल नंबर
जर तुमच्या कुटुंबात नवीन लग्न होऊन आली असेल, तर तिचे नाव जोडण्यासाठी तिच्या माहेरच्या शिधापत्रिकेतून नाव कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर माहेरच्या शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला, आधार कार्ड आणि लग्नाचा दाखला आवश्यक आहे. जर तुमच्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला आले असेल तर त्याचे नाव शिधापत्रिकेमध्ये जोडण्यासाठी जन्माचा दाखला आणि आई-वडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे. Ration Card New Member Add
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेमध्ये ₹2 लाख गुंतवल्यास दरमहा किती रुपये व्याज मिळेल; जाणून घ्या सविस्तर
शिधापत्रिका मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी अर्ज कुठे करावा?
ऑनलाइन पद्धत:
- सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्नपुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- जर तुमच्या अकाउंट नसेल तर नवीन अकाउंट तयार करा आणि असेल तर लॉगिन करा.
- वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर नवीन सदस्य जोडा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- नवीन सदस्याची संपूर्ण माहिती अचूक काळजीपूर्वक भरा.
- वर दिलेल्या सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. हा नोंदणी क्रमांक जपून ठेवा या क्रमांकाचा उपयोग तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करू शकता.
ऑफलाइन पद्धत
- सर्वप्रथम जवळच्या अन्नपुरवठा कार्यालयात नवीन सदस्य जोडण्याचा फॉर्म भरून द्या.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक योग्य प्रकारे भरा.
- वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे फॉर्मुला जोडा.
- भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करा. यासाठी तुम्हाला 50 ते 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
- फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला एक मिळकत पावती मिळेल ती काळजीपूर्वक ठेवा.
अर्जाची स्थिती कशी तपासावी?
तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. यासाठी तुमच्याकडे मिळालेला नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील नवीन सदस्य जोडण्याचे काम करू शकता. यासाठी मेरा रेशन या मोबाईल ॲपचा वापर करावा लागेल. मात्र यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत जोडलेला आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा की अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल. सर्व माहिती आणि कागदपत्रे बरोबर असल्यास नवीन शिधापत्रिका तुमच्या पत्त्यावर पाठवली जाईल.