8th Pay Commission : सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न सध्या घोळतोय यावेळी पगारात किती रुपयांनी वाढ होणार? प्रत्येक वेळी जेव्हा वेतन आयोग येतो, तेव्हा सर्व सरकारी कर्मचारी, आणि पेन्शन धारक व त्यांच्या कुटुंबाच्या मनात आशाचा एक नवा किरण येतो. वाटतं, आता महागाईच्या या सततच्यात चढउतारामध्ये थोडा तरी दिलासा मिळेल. मुला बाळांच्या शिक्षणापासून ते ग्रह कर्जापर्यंत थोडं दिलासा मिळेल. 8th Pay Commission
पण यंदाच्या म्हणजे 8 व वेतन आयोग मात्र या अपेक्षांवर थोडासा थंड पाणी ओतणार असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. कारण सध्याची माहिती समोर येत आहे, त्यावरून हे स्पष्ट होत आहे की वेतन आयोगात मिळणारी वाढ ही इतिहासातील सर्वात कमी वाढ ठरू शकते.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, येवळी फिटमेंट केवळ 1.8 इतकच राहू शकतो. जर अस झालं, तर अस झालं, तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात फक्त 13 टक्क्यांची वाढ होईल जी की मागील आयोगांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 6 वा वेतन आयोग 54% वाढ तर सातवा वेतन आयोग 14% वाढ, आणि आठवा वेतन आयोग फक्त 13% सरकार जर खरोखर 1.8 फिटमेंट फॅक्टर ठेवलं, तर या वेतन आयोगांकडून सर्वात कमी पगार वाढ होणार हे जवळपास निश्चित आहे.
पण फिटमेंट फॅक्टर म्हणजे नक्की काय रे भाऊ?
सरळ उदाहरण देतो की समजा तुमचा मूळ पगार मिळणार 10,000 रुपये आहे. जर पीटमेंट फॅक्टर 2.57 ( जसा 7 व्या आयोगात होता) लावला, तर तोच पगार 25,700 होतो. म्हणजे फिटमेंट फॅक्टर जितका जास्त, तितका पगारात फायदा. मात्र आठव्या वेतन आयोगात जर तो 1.8 झाला तर फारसा फरक पडणार नाही. आणि कर्मचाऱ्यांना याच सर्वात जास्त वाईट वाटणार आहे. कारण तुलना मध्ये महागाई आणि जीवनाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना पगार केवळ बेसिक पे मध्ये मर्यादीमध्ये नसतो. त्यात DA (महागाई भत्ता), HRA (घर भाडे), आणि TA (प्रवास भत्ता) सुद्धा जोडलेला असतात. सध्या DA बेसिक पगारांच्या 55% वर आहे.
मात्र नवीन आयोग लागू झाल्यावर हा DA पुन्हा शून्य पासून सुरू होतो, आणि हळूहळू वाढतो. त्यामुळे सुरुवातीला थोडं पगारात कमी वाटू शकत.
सरकारने आठवा वेतन आयोगाची प्रक्रिया जानेवारी 2025 पासून सुरू केली आहे. मात्र अजून पर्यंत आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सर्वप्रक्रिया थोडीशी हळू गतीने असल्याचा म्हटले जात आहे. तरी सूत्रांच्या माहितीनुसार सरकार जेव्हा आयोग लागू करेल, तेव्हा तो जानेवारी 2026 पासून लागू मानला जाईल. म्हणजे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मागील महिन्याचा एरियार मोठ्य रुकमेने मिळू शकतो.
(Disclaimer: वरील माहिती माहितीस्त्रोच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
हे पण वाचा | 8 Pay Commission News : सेवानिवृत्तांनो, आता आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता विसराच! सरकारचा नवा कायदा लागू