Jalsampada vibhag Bharti 2025 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी निर्माण झालेली आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत आहात आणि सरकारी नोकरीची तयारी करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात थेट भरती जाहीर करण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यामध्ये अभियंता पात्र उमेदवारांना या संधीचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ही भरती थेट सेवा करार पद्धतीने केली जाणार असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 14 ऑगस्ट 2025. त्यामुळे तुम्ही जर अनुभव असलेले अभियंता असाल आणि सरकारी यंत्रणेत काम करण्याची इच्छा बाळगत असाल, तरी संधी तुमच्यासाठीच आहे. Jalsampada vibhag Bharti 2025
कुठे नोकरी? कोणते पद?
या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता या पदासाठी नाशिक जिल्ह्यात भरती केली जाणार आहे. एकूण पाच रिक्त पद असून, कामाचे ठिकाण असलेलं महाराष्ट्र अभियंता संशोधन संस्था, मेरी नाशिक तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालय.
हि नोकरी सेवा करार पद्धतीने करणार आहे. नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. जर आवश्यकता भासली तर नियुक्तीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. वेतनश्रेणी शासनाच्या निर्णयानुसार दिले जाणार आहे म्हणजे शासन ठरवलेल्या पद्धतीने दरमहा तुम्हाला मानधान मिळेल.
पात्रता व अटी काय ?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तांत्रिक कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. तसेच खालील अटी लागू होणार आहेत.
फिजिकल आणि मेंटल प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे, उमेदवार दिवाणी न्यायालयात कोणतेही चौकशी प्रलंबित नसावी, याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे लागेल (Character Certificate). जलसंपदा विभागा संबंधित तांत्रिक अनुभव असल्यास अधिक प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज कसा करायचा?
अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने केला जाईल त्यासाठी अर्जदाराने आपल्या सर्व अर्ज प्रमाणपत्र खालील दिलेल्या पत्त्यावरती पोस्टाने किंवा थेट हजर राहून 14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवायचे आहेत. यामध्ये तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आरोग्य प्रमाणपत्र, स्वतःची पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी जोडणे आवश्यक असणार आहे.
त्यानंतर कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परीक्षण विभाग, मेरी इमारत, दिंडोरी रोड, नाशिक – 422004.
Disclaimer: वरील दिलेली माहिती केवळ माहिती करीत आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची सखोल चौकशी करावी याबाबत आम्ही कुठलीही माहिती पुरवत नाही जर भरती बाबत कुठलीही फसवीगिरी झाली तर याबाबत आम्ही जबाबदार नाही.
हे पण वाचा| सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज