Post Office Monthly Scheme : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहोत. जर तुम्ही देखील एखाद्या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची ठरणार आहे. घर चालता चालता हातभार लावणे हे प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावरील एक मोठंओज असत. पण जर तुम्ही एकदाच थोडी रक्कम गुंतवली आणि महिन्याला निश्चित उत्पन्न मिळाले, तर किती बरं होईल ना? अशीच एक योजना म्हणजे Post Office ची Monthly Income Scheme (MIS). ही योजना आजही लाखो सामान्य कुटुंबाच्या रोजच्या गरजांचा आधार ठरत आहे. विशेषत: शेती, मजुरी किंवा छोट्या व्यवसायावर जगणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी ही योजना म्हणजे एक प्रकारची आर्थिक हमीच आहे. Post Office Monthly Scheme
MIS म्हणजे काय?
मित्रांनो गुंतवणूक करणे आणि महिन्याला इन्कम मिळणे हे खूप महत्त्वाच आहे. पोस्ट ऑफिस ची ही योजना अशी आहे की, दरमहा ठराविक रक्कम व्याज म्हणून खात्यात जमा होते. म्हणजे नोकरी नसेल, व्यवसायात चढउतार असतील तरीही दर महिन्यात एक निश्चित उत्पन्न तुमच्याकडे येत राहील.
जर एखाद्या व्यक्तीने MIS योजनेमध्ये दोन लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला त्याला ₹1233 रुपये फिक्स आणि खात्रीशीर मिळणार आहेत. ही रक्कम पाच वर्षे प्रत्येक महिन्याला खात्यामध्ये जमा होते. आणि पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण दोन लाख रुपये ही परत मिळतात. म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला दर महिन्याला बाराशे 33 रुपये मिळाले तर याला गुणिले 60 महिने केले तर होणार आहे. 73 हजार 980 रुपये म्हणजे निव्वळ तुम्हाला एवढे व्याज मिळणार आहे आणि दोन लाख रुपये ही तुमची मूळ रक्कम असणार आहे तर या दोन्हीची बेरीज केली तर टोटल ₹2,73,980 रुपये मिळणार आहे.
कोणता व्यक्ती उघडू शकतो खात?
या योजनेमध्ये भारतीय नागरिक ही योजना चालू करू शकतात. साधं पोस्ट ऑफिस सेविंग खातं असणं आवश्यक आहे. फक्त ₹1000 पासून ही खाते सुरू करता येतात. एकट खातं उघडलं तर ₹9 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते. जॉईंट अकाउंट ( 3 लोक) असल्यास 15 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते.
ही योजना पाच वर्षानंतर मॅच्युअर होते, सुरक्षित गुंतवणूक कारण पोस्ट ऑफिस सरकारच्या अखत्यारीत येत. रिटायर लोक, गृहिणी, शेतकरी आणि ज्यांच्या हातात नोकरी नाही, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त योजना. कोणत्याही जोखीम नाही, बँक सारखे ॲप डाऊन नाही. सरळ आणि शंभर टक्के सुरक्षित.
(Disclaimer: वरील दिलेली बातमी केवळ एक माहिती करत आहे, कुठल्याही आर्थिक गुंतवणुकी बाबत सल्ला दिलेला नाही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)