Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आता घराघरात सुप्रसिद्ध झाली आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार दिला आहे. या योजनेतून मिळालेल्या लाभापासून अनेक महिला स्वतःचे कुटुंब चालवत आहेत. तर अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. दरम्यान या योजनेसंदर्भात मोठी चर्चा होत आहे. जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्ट चे हप्ते एकत्र म्हणजेच महिलांना एकत्रित 3000 मिळणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाचा सण आल्याने या दिवशी महिलांना डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुलै ऑगस्ट चा हप्ता एकत्रित मिळणार का?
जुलै महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही जुलै महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. मागील वर्षाचा अनुभव पाहता जुलै आणि ऑगस्ट 2024 चे हप्ते एकत्रित तीन हजार रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर यंदाही जुलै आणि ऑगस्ट 2025 चे हप्ते एकत्रित जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रक्षाबंधन जवळ आला आहे, त्यामुळे या सणानिमित्त महिलांना दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधन निमित्त ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते. मात्र यासंदर्भात सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही असे निमित्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची सरकारची सुरुवातीपासूनची पद्धत आहे. त्यामुळे रक्षाबंधनला एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. Mazi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जुलै महिन्याचे ₹1500 खात्यात जमा होणार?
रक्षाबंधनला मिळणार खास गिफ्ट?
रक्षाबंधन हा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या अतूट नात्यांचा उत्सव असतो. यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळू शकते. गेल्या वर्षी प्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ता जमा करण्याची परंपरा यंदाही सरकार कायम ठेवू शकते. यावर्षीही सरकार रक्षाबंधन चे निमित्त साधून जुलै आणि ऑगस्ट चे हप्ते एकत्रित जमा करून महिलांना आर्थिक मदत देऊ शकते. यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा आधार मिळेल.
या महिलांना मिळणार नाही लाभ
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे.
- ज्या महिला चार चाकी वाहनाच्या मालक आहेत.
- ज्या महिला आयकर भरत आहेत.
- सरकारी नोकरीला असलेल्या महिलांना देखील लाभ मिळणार नाही.
- ज्या महिला पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना या योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळतील.
हे पण वाचा| पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे ₹2000 कधी मिळणार? शेतकरी मोठ्या चिंतेत!
2100 रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करू अशी घोषणा केली होती. मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा आणि उपलब्ध निधीचा विचार करता ही वाढ मार्च किंवा एप्रिल 2025 पासून लागू केली जाण्याची शक्यता होती. मात्र तेव्हाही याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सध्या प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहेत. 2025 26 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात वाढीव हप्ता मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांच्या आर्थिक आधाराचे कारण बनली आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 11 हप्ते लाभार्थी महिलांना वितरित करण्यात आले आहेत. या योजनेच्या आर्थिक मदतीतून महिलांना शिक्षण, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी मोठी मदत केली आहे. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणी पुढेही सुरूच ठेवावी आणि डिजिटल पेमेंट यंत्रणेद्वारे यात अधिक पारदर्शकता आणायचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा सर्वांना आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्ट चा हप्ता एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे आणि रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर तीन हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची आशा आहे. याबाबतच्या अधिकृत घोषणे साठी थोडी वाट पहावी लागू शकते.
1 thought on “लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधणाला डबल गिफ्ट, जुलै-ऑगस्ट महिन्याचे ₹3,000 एकत्र मिळू शकतात?”