Post Office RD Yojana: आज-काल वाढत्या महागाईमुळे भविष्याची चिंता प्रत्येकालाच असते. प्रत्येक जण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी कुठेतरी गुंतवणूक करू इच्छित असतात. अशावेळी सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक प्रत्येकजण शोधत असते. महिन्याचा खर्च वाढत चालला आहे आणि अशा परिस्थितीत पैशाची बचत करणं खूपच आवश्यक झाले आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुमचं भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होऊ शकते. तुमच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिस ची अशीच एक भन्नाट योजना आहे, जी तुम्हाला कमी गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळून देऊ शकते.
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही एक अशी योजना आहे जिथे तुम्ही नियमितपणे छोटे रक्कम गुंतवून भविष्यासाठी एक मोठी रक्कम मिळवू शकतात. मुलांचे शिक्षण असो किंवा अचानक येणाऱ्या वेदकीय खर्च असो हे पैसे तुम्हाला अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगी उपयोगी येऊ शकतात. या योजनेत केवळ ठराविक रक्कम जमा करून तुम्हाला चांगला नफा मिळवता येऊ शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त 1000 रुपया पासून या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. यात तुम्हाला सुरक्षिता आणि चांगले आकर्षक व्याजदर मिळतो.post Office Scheme
हे पण वाचा| दरमहा फक्त ₹210 गुंतवा अन् 5,000 रुपयांची पेन्शन मिळवा; जाणून घ्या काय आहे अटल पेन्शन योजना?
दरमहा 10000 रुपये गुंतवल्यावर किती रुपये मिळतील?
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये दरमहा दहा हजार रुपये गुंतवले म्हणजेच दररोज साधारण 340 गुंतवले तर पाच वर्षानंतर तुम्हाला तब्बल 7 लाख 12 हजार 659 रुपये मिळतील. यात तुम्ही जमा केलेली एकूण रक्कम 6 लाख असेल आणि त्यावर तुम्हाला 1 लाख 12 हजार 659 रुपये व्याज मिळेल. तुमच्या नियमित बचतीमुळे तुम्ही एवढा मोठा निधी तयार करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही गुंतवलेली सर्व रक्कम सरकारी हमीमुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा आणखीन एक फायदा म्हणजे जर तुम्ही एका वर्षासाठी आरडी सुरू केली असेल तर तुम्ही जमा केलेल्या रकमेवर 50% पर्यंत कर्ज देखील घेऊ शकता. समजा आरडी केल्यानंतर तुम्हाला मध्येच काही पैशांची गरज भासली तर तुम्ही एक वर्षात जमा केलेल्या रकमेच्या 50% कर्ज मिळू शकतात. नोकरी करणारे लोक, दुकानदार, गृहणी आणि विद्यार्थी असे सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. Post Office RD Yojana
हे पण वाचा| SBI ची 444 दिवसांची अमृत वृष्टी FD योजना बनवणार मालामाल! ₹4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा..
पाच वर्षाची मुदत
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेला मुदत पाच वर्षाचे असते. मात्र तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही योजना अजून पाच वर्षासाठी वाढवू देखील शकतात. खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो गरजेचा आहे. तुम्ही ऑनलाईन देखील खाते उघडून घेऊ शकता आणि दर महिन्याला तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. योजना तुमच्या भविष्यासाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरू शकते. गुंतवणुकीच्या शोधात असाल तर विचार कसला करताय लगेच पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक करून तुमच्या आर्थिक भविष्याची सुरक्षितता निश्चित करा.
1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत दररोज ₹340 गुंतवा आणि मिळवा 7 लाख रुपयांचा नफा..”