मोठी बातमी! Phonepay, Google Pay, Paytm हे  वापरताय? तर यावरती सात नवीन नियम लागू झाले! वाचा सविस्तर माहिती


Google Pay Phone Pay News :  भाऊ, सध्या डिजिटल जमाना आहे. आणि मोबाईल मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जात आहे. याच मोबाईलच्या माध्यमातून आपले अनेक कामे पूर्ण होतात. जर आपल्याला कुठे सांगायचं झालं, आपल्याला त्या ठिकाणी जावं लागायचं परंतु आता घरी बसल्या किंवा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरा ठिकाणी सहज ते काम पूर्ण करू शकता. आणि यासोबत पैसे देखील पाठवणे आता एकदम सोप्प झालेले आहे. एक लाख रुपयापर्यंत व्यवहार आपण एका मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतो. परंतु आता व्यवहार करण्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePay, Paytm पेमेंट करण्यासाठी वापरत असाल तर यामध्ये मोठी बदल करण्यात आलेले आहेत त्यासाठी ही बातमी नक्की वाचा.

रोजच्या जीवनामध्ये आपल्याला धावपळ करावी लागते कधी इकडे तर कधी तिकडे, कोणत्या मित्राकडून पैसे घ्यायचे आहेत व कोणत्या मित्राला पैसे द्यायचे आहेत ही देखील एक धावपळच आहे. परंतु आता धापड करण्याऐवजी आपण मोबाईल टू मोबाईल पैसे पाठवू शकतो. परंतु आता एक ऑगस्ट पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने काही नवीन नियम लागू करत UPI आणखी जलद, सुरक्षित आणि शिस्तबद्ध बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. Google Pay Phone Pay News

गावामधून, शहरापर्यंत तसेच किरण दुकानापासून तर भाजीवाल्यापर्यंत आज सगळ्यांकडे UPI वापरला जात. पण मागच्या काही महिन्यांपासून ट्रांजेक्शन अडकणे, बॅलन्स न दिसणे, पैसे गेल्यावर सुद्धा याचा मेसेज न येणे अशा तक्रारी वाढल्या होत्या. हे सगळं थांबवण्यासाठी NPCI ने 7 मोठे नियम बदलून नवे नियम लागू केले आहेत.

कोणत्या आहेत नवीन साथ नियम पहा एकदा

दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स चेक करता येणार: रोज फोन उघडून वारंवार बॅलन्स चेक करायची सवय असेल, तर ती आता बदलावी लागणार. कारण आता दिवसभरात फक्त ५० वेळा बॅलन्स बघता येणार. त्यामुळे उगाच सिस्टिमवर लोड येणार नाही आणि अडचणीही कमी होतील.

बँक अकाउंट तपासण्याची मर्यादा:  फक्त २५ वेळा तुमच्या मोबाईल नंबरवर किती बँका लिंक आहेत हे दिवसातून जास्तीत जास्त २५ वेळाच तपासता येईल.

Autopay व्यवहार ठराविक वेळातच होतील: नेटफ्लिक्स, म्युच्युअल फंड किंवा EMI यांसारखे Autopay व्यवहार आता तीनच वेळा प्रोसेस होतील सकाळी 10 वाजेपूर्वी, दुपारी 1 ते संध्याकाळी 5,रात्री 9.30 नंतर

Failed ट्रान्सॅक्शन स्टेटस दिवसातून फक्त 3 वेळाच चेक करता येईल : UPI फेल झाला की लोक लगेच 10-10 वेळा स्टेटस चेक करतात, यामुळे सर्व्हर हँग होतो. आता दिवसातून फक्त 3 वेळाच स्टेटस चेक करता येईल आणि प्रत्येक वेळेत 90 सेकंदाचं अंतर ठेवावं लागेल.

पेमेंट करताना आता बँकेचं नाव दिसेल: आता जर कुणाला पैसे पाठवत असाल तर त्याच्या नावासोबत बँकेचं नाव सुद्धा स्क्रीनवर दिसणार. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवण्याचा धोका टळेल.

पेमेंट रिव्हर्सल म्हणजे चार्जबॅक मर्यादा ठरलीय जर चुकीने पैसे गेले आणि तुम्ही पैसे परत मागितले (चार्जबॅक), तर आता 30 दिवसात फक्त 10 वेळाच मागू शकता आणि एखाद्याच्याचकडून 5 वेळा पर्यंतच.

बँक व अॅप्सना सर्व्हर मॉनिटरिंगचे निर्देश: सर्व्हर हँग, स्लो ट्रान्झेंक्शन यासाठी NPCI ने बँका आणि अॅप्सना API मॉनिटरिंगची जबाबदारी दिलीय.

तर अशा पद्धतीने आपण पाहिले पण ते नवीन साथ बदल होणार आहेत आणि यापुढे देखील तुम्हाला असेच अपडेट हवे असतील तर आमच्या वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती भेटत राहील आणि ही माहिती आपल्या नक्कीच मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या अपडेट ची माहिती होईल भविष्यामध्ये त्यांचीही गैरसोय होऊ नाही त्यासाठी ही माहिती योग्य ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!