Atal Pension Yojana: दरमहा फक्त ₹210 गुंतवा अन् 5,000 रुपयांची पेन्शन मिळवा; जाणून घ्या काय आहे अटल पेन्शन योजना?


Atal Pension Yojana: प्रत्येकांना आपल्या भविष्याची चिंता असते, विशेषता निवृत्तीनंतरच्या आयुष्याची प्रत्येक जणाला काळजी असते. पण आता चिंता करायची गरज नाही कारण अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आली आहे. जिथे तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून निवृत्तीनंतर सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही योजना सरकारची हमी असल्याने तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित असेल. या योजनेत दररोज किती रुपये गुंतवून किती पेन्शन मिळेल? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

फक्त 7 रुपये दररोज गुंतवा अन् मिळवा 5000 रुपये पेन्शन

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या योजनेत तुम्ही दररोज फक्त सात रुपये गुंतवून निवृत्तीनंतर पाच हजार रुपयापर्यंत मानसिक पेन्शन मिळू शकतात. दररोज एका चहाच्या खर्चापेक्षा कमी किमतीची गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या भविष्याला सुरक्षित करू शकतात. याचा अर्थ असा की महिन्याला फक्त 210 रुपये गुंतवणूक तुम्हाला साठ वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये पेन्शन मिळेल. जर तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन हवे असेल तर त्यासाठी दर महिन्याला फक्त 42 रुपयाचे गुंतवणूक करावी लागेल.

हे पण वाचा| SBI ची 444 दिवसांची अमृत वृष्टी FD योजना बनवणार मालामाल! ₹4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा..

7 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचा लाभ

अटल पेन्शन योजनेची लोकप्रियता दिवसान दिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या योजनेत जवळपास सात कोटी पेक्षा जास्त भारतीय नागरिकांनी लाभ घेतला आहे. ही योजना विशेष अशा लोकांसाठी तयार केली आहे ज्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची हमी हवी आहे. या योजनेत तुम्ही आजपासून ठराविक रक्कम गुंतवणूक सुरू केली तर भविष्यात तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळण्यास सुरुवात होईल.

अटल पेन्शन योजनेची पात्रता

तुम्ही 18 ते 40 वयोगटातील भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त नफा तुम्हाला मिळेल. उदाहरणार्थ जर तुम्ही वीस वर्षाच्या आत गुंतवणूक सुरू केली तर 40 वर्षापर्यंत तुमची गुंतवलेली रक्कम जास्त जमा होईल आणि साठ वर्षानंतर तुम्हाला नियमित पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही 40 व्या वर्षी जरी गुंतवणुकीला सुरुवात केली तरी साठ वर्षानंतर तुम्हाला पेन्शन मिळायला सुरुवात होईल. Atal Pension Yojana

हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून 5 लाखांपर्यंत परताव मिळवा..!

पती-पत्नी दोघेही घेऊ शकतात लाभ

अटल पेन्शन योजनेची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ पती-पत्नी दोघेही स्वतंत्रपणे घेऊ शकतात. यामध्ये दोघांनाही स्वतंत्रपणे गुंतवणूक करून एकत्रितपणे दहा हजार रुपयापर्यंत मानसिक पेन्शन मिळवताय येऊ शकते. यामुळे कुटुंबासाठी निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत तयार होते.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दरमहा 1000 ते 5000 रुपयापर्यंत पेन्शन मिळते. जे तुमच्या मासिक गुंतवणुकीवर अवलंबून असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पेन्शनवर सरकार स्वतः गॅरंटी देते त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीची रक्कम पूर्णपणे सुरक्षित असून भविष्यात तुम्हाला खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे. तुमच्या कमाईतील दररोज थोडी रक्कम बाजूला काढून योग्य योजनेत गुंतवणूक करणे हे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अटल पेन्शन योजना ही एक सुरक्षित आणि चांगला परताव देणारी योजना आहे. जे तुम्हाला कमी गुंतवणुकीत आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. तुम्ही अजूनही या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर आत्ताच सुरुवात करा आणि आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याला सुरक्षित करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “Atal Pension Yojana: दरमहा फक्त ₹210 गुंतवा अन् 5,000 रुपयांची पेन्शन मिळवा; जाणून घ्या काय आहे अटल पेन्शन योजना?”

Leave a Comment

error: Content is protected !!