SBI FD Scheme: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत केलेली गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित मानली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना घेऊन येत असते. एसबीआय मध्ये कर्ज सोबतच बँक मुदत ठेवी (FD) योजनेवरही आकर्षक व्याजदर दिला जातो. सध्या एसबीआय मध्ये 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या विविध FD योजना उपलब्ध आहेत. SBI मध्ये एफडी योजनेला किती टक्के व्याजदर मिळतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर SBI मध्ये 3.05% ते 7.20% पर्यंत FD ला व्याज दिले जाते.
या नियमित FD योजना व्यतिरिक्त SBI ने काही विशेष FD योजना देखील सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 444 दिवसाची अमृत वृष्टी विशेष FD योजना. ही योजना SBI च्या ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे. या योजनेत आकर्षक व्याजदर दिला जातो त्यामुळे ग्राहकांना चांगला परतावा मिळतो. आज या लेखांमध्ये आपण याच योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. SBI FD Scheme
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून 5 लाखांपर्यंत परताव मिळवा..!
SBI ची 444 दिवसाची अमृत वृष्टी FD योजना
SBI च्या 444 दिवसाच्या अमृतवृष्टी FD योजनेमध्ये गुंतवणूक करणे ग्राहकांसाठी मोठे फायद्याचे ठरत आहे. या योजनेत सर्वसामान्य ग्राहकांना सध्या 6.60% व्याजदर दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी (senior citizen) तर ही योजना अधिकच लाभ देणारी ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 7.10% व्याजदर दिला जातो. त्याचबरोबर सुपर सीनियर सिटीजन म्हणजेच 80 वर्षावरील व्यक्तींसाठी SBI च्या या योजनेत 7.20% व्याजदर दिला जातो. हा व्याजदर इतर FD योजनेपेक्षा खूप जास्त आहे.
या योजनेत ₹4 लाखांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळेल?
जर तुम्ही SBI च्या 444 दिवसाच्या अमृत वृष्टी FD योजनेत 4 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटी नंतर किती परतावा मिळेल याची माहिती आपण जाणून घेऊया.
हे पण वाचा| या बँकेत तुमचे खाते आहे का? या दोन बँकांनी घेतला मोठा निर्णय, ग्राहकांवर काय परिणाम होणार?
- सामान्य गुंतवणूकदार: जर सामान्य गुंतवणूकदराने या योजनेत 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी नंतर 433154 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला 33 हजार 154 रुपये व्याज मिळेल.
- ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदार(senior citizen): जर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर 435752 रुपये मिळतील. याचा अर्थ त्यांना व्याजातून 35752 रुपये चा लाभ होईल.
- सुपर सीनियर सिटीजन (super senior citizen): 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सुपर सीनियर सिटीजन साठी ही योजना सर्वात जास्त लाभ देते. जर सुपर सीनियर सिटीजन ने या योजनेत 4 लाख रुपयाचे गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी नंतर त्यांना 436,273 रुपये मिळतील. म्हणजेच त्यांना 36 हजार 273 रुपये व्याजातून मिळतील.
तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, आणि तुम्हाला SBI सारख्या मोठ्या बँकेत गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायद्याची ठरू शकते. SBI ची 444 दिवसाची अमृत वृष्टी FD योजना ही अगदी कमी कालावधीत चांगला परतावा मिळून देते. विशेषता जेष्ठ नागरिक आणि सुपर सीनियर सिटीजन साठी ही योजना खूपच फायद्याची ठरत आहे. तुम्हाला देखील गुंतवणूक करायचे असेल तर या योजनेचा नक्कीच विचार करा.
2 thoughts on “SBI ची 444 दिवसांची अमृत वृष्टी FD योजना बनवणार मालामाल! ₹4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा..”