Ration Card New Update: शिधापत्रिकाधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही देखील रेशन कार्ड धारक असाल आणि अजूनही ई केवायसी केली नसेल तर सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला रेशन मिळणे बंद होणार आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी वारंवार मुदतवाढ दिली असली तरी अजूनही अनेक नागरिकांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे सरकारने यावर कठोर भूमिका घेऊन, कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक रेशन कार्डधारकांना ई केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे. यामागे योजनेतील पारदर्शकता वाढवणे आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत धान्यचा लाभ पोहोचवणे हा मुख्य उद्देश मानला जात आहे.
मुदतवाढ करूनही अनेक शिधापत्रिकाधारक प्रलंबित
तुम्हालाही माहित असेल सरकारने ई केवायसी करण्यासाठी याआधी तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिका धारकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. शहापूर तालुक्यात सुमारे 43 हजार शिधापत्रिकाधारकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. राज्याची आकडेवारी तर यापेक्षा कितीतरी जास्त असल्याची शक्यता आहे. या सर्वांसाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर जर तुम्ही केवायसी केली नाही तर सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला रेशन कार्डचा लाभ मिळणार नाही.
हे पण वाचा| किंग कोब्राला जंगलात सोडायला गेला अन् तरुणांसोबत घडली भयंकर घटना.; Video पाहून भरेल धडकी
तुमचं नाव यादीत आहे का? कसे तपासावे?
तुमचं नाव प्रलंबित यादीत आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला संबंधित रेशन दुकानात किंवा तहसील कार्यालयात चौकशी करावी लागेल. अनेक ठिकाणी याद्या लावण्यात आल्या आहेत यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकतात. जर तुमचे नाव प्रलंबित यादीमध्ये निदर्शनात आले तर तुम्हाला त्वरित जवळील रेशन दुकानात जाऊन तुमच्या रेशन कार्ड ची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
ई केवायसी कुठे करावी?
जर तुमची ई केवायसी अजून प्रलंबित असेल तर घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे अजूनही थोडा वेळ शिल्लक आहे. तुम्ही खालील दिलेल्या ठिकाणावर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. Ration Card New Update
- तुमच्या जवळील कोणत्याही सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही आधार क्रमांक आणि रेशन कार्ड तपशील सादर करून ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात.
- तुम्ही तुमच्या स्मार्टफोन प्ले स्टोअर वर मेरा रेशन एप्लीकेशन डाउनलोड करून मोबाईलद्वारे घरबसल्या ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
लवकर करा नाहीतर रेशन बंद
यामुळे ज्या रेशन कार्डधारकांनी अजूनही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांनी जराही उशीर केला तर रेशन कायमचा बंद होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अन्यथा तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून मिळणारे धान्य बंद होऊ शकते. हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे तुमच्या कुटुंबाच्या गरजांसाठी हे धान्य अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
1 thought on “शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचे नाव आहे का?”