RBI Banking News : महाराष्ट्रातील बँक खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सध्या आरबीआय ॲक्शन मोडवर असून महाराष्ट्रातील तीन मोठ्या नामांकित बँकेने वरती मोठा दंड ठोठावला आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की बँकेत पैसे ठेवावा का नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सध्या बँकेवर विश्वास ठेवणं कठीण झालेला आहे. सामान्य माणूस आपल्या मेहनतीचे पैसे सुरक्षित ठेवतो तो म्हणजे बँकेत. पण जर बँकांनीच नियम ढाब्यावर बसवले, तर मग सर्वसामान्य जनतेने काय करावे? हाच सध्या मोठा प्रश्न मनामध्ये उपस्थित झालेला आहे. कारण देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नुकतीच चार सहकारी बँकेवर कारवाई केली. आणि यात विशेष म्हणजे तीन बँका महाराष्ट्र मधले आहेत. RBI Banking News
RBI वेळोवेळी बँकांची चौकशी करते, नियमांचे पालन होतं की नाही हे बघते. पण यावेळी चार बँकांनी इन्कम रेकग्निशन, केवायसी, सुपरवायजरी फ्रेमवर्क, कर्ज मर्यादा अशा गंभीर बाबतीत नियम तोडल्याचं समोर आलंय. यामुळे RBI ने त्यांच्यावर थेट आर्थिक दंडाची कारवाई केलीय.
शहादा पीपल्स को-ऑपरेटिव बँक लिमिटेड (नंदुरबार जिल्हा) दंड ₹2 लाख
ही बँक उत्तर महाराष्ट्रातल्या आदिवासी भागात लोकांचे बँकिंग भागवत होती. पण आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँकेत इन्कम रेकग्निशन, प्रोव्हिजनिंग यासारख्या मूलभूत बँकिंग नियमांचे अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे बँकेला बँकिंग रेगुलेशन कायदा 1949 च्या कलमनुसार दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे.
मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड – दंड 6 लाख रुपये
मराठवाड्यातील जालना शहरातील व्यापाऱ्यांचे प्रमुख आधार असलेली ही बँक. पण आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेने संचालकांना दिलेलं कर्ज व एकाच गटातील कर्जदारांवरील मर्यादा या बाबतीत नियमांचे उल्लंघन केलं. त्यामुळे या बँकेला सर्वाधिक ₹6लाख दंड ठोठावण्यात आलेला आहे.
सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई दंड वीस हजार रुपये
राजधानी मुंबईतील ही बँक, आरबीआयच्या सुपरवायझरी फ्रेमवर्क च्या अटींच पालन न केल्यामुळे या बँकेवर दंड झालेला आहे, रक्कम कमी वाटलं तरी नियम तोडले गेले हे स्पष्ट होतं.
तर सर्वसामान्य माणसाचं काय?
बँक लोकांवर जीवापाड विश्वास ठेवतात. भाऊ माझे पैसे बँकेत आहेत. शेतकरी, कामगार, रिक्षावाला, किराणा दुकानदार सगळ्यांचे पैसे सहकारी बँक म्हणजे आपल्या परिसरातल्या विश्वासांच्या संस्था असतात. पण जर यात संस्था नियम मोडून काम करत असतील, तरी बाब काळजीची आहे. कारण हाच थेट परिणाम बँकेवर ठेवी ठेवणाऱ्या माणसावर होतो.
RBI ची ही कारवाई म्हणजे इशारा आहे, नियम पाळा, नाहीतर कारवाईला सामोरे जा. आणि त्याचबरोबर आपल्यालाही सजग होणं गरजेच आहे. एखाद्या बँकेत पैसे ठेवण्याआधी तिची पारदर्शकता, RBI च निरक्षण, आणि ग्राहकांची वागणूक कशी आहे हे पाहणं आज अत्यावश्यक झाला आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
हे पण वाचा | RBI Breaking News : या 5 बँकेवर RBI ची कठोर कारवाई! या बँकेत तुमचे तर खाते नाही ना चेक करा