Post Office NSC Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून 5 लाखांपर्यंत परताव मिळवा..!


Post Office NSC Scheme: आपल्या भविष्यासाठी काही पैसे साठवून अडीनडीला त्याचा उपयोग करावा. या हेतूने अनेक जण कुठेतरी पैशाची गुंतवणूक करून त्यावर चांगला परतावा कसा मिळवता येईल याचा शोध घेत असतात. पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते योग्यरीत्या कुठेतरी गुंतवणे महत्त्वाचे ठरते. विशेषता जर तुम्हाला कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळवायचा असेल. अशा परिस्थितीत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NCS) ही पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाणारी एक उत्तम सरकारी योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम तुमच्यासाठी सुरक्षित आणि आकर्षक परताव देणारे ठरू शकते. या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

NCS म्हणजे काय?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NCS) ही केंद्र सरकारची एक मोठी बचत योजना आहे. जी पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान एक हजार रुपये लागतात आणि कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना केंद्र सरकारच्या मालकीची असल्याने यामध्ये गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. म्हणजेच तुमचे पैसे बुडाण्याची कोणतीही भीती या योजनेमध्ये नाही. याशिवाय आयकर भरणाऱ्या कलम 80 C अंतर्गत तुम्हाला कर सवलत देखील या योजनेअंतर्गत मिळते. ज्यामुळे तुमची कर बचत मोठ्या प्रमाणात होते.

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर

व्याजदरात चक्रवाढ पद्धतीमुळे फायदा

सध्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत वार्षिक 7.7 टक्के व्याजदर दिला जातो. हे व्याज दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने तुमच्या मुद्दलात जोडले जाते. ज्यामुळे तुम्हाला वेळेनुसार अधिक परतावा मिळतो. या गुंतवणुकीवर पाच वर्षाचा लॉक इन कालावधी असतो. याचा अर्थ जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षासाठी तुमचे पैसे काढता येणार नाहीत. जर तुम्ही या कालावधी पूर्वी पैसे काढले तर तुम्हाला व्याज दिले जाणार नाही. त्यामुळे या योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी लॉक इन कालावधी पर्यंत पैसे काढू नका.

किती गुंतवणुकीवर किती नफा मिळेल?

चक्रवाढ व्याजामुळे NCS मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. खाली किती रुपये गुंतवल्यावर किती परतावा मिळतो याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

  • 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 44 हजार 9995 व्याज मिळेल आणि एकूण परतावा 1 लाख 44 हजार 995 रुपये होईल.
  • 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 2 लाख 24 हजार 974 रुपये व्याज मिळेल आणि एकूण परतावा 7 लाख 24 हजार 974 रुपये होईल.
  • 11 लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 4 लाख 93 हजार 937 रुपये व्याज मिळेल, आणि एकूण परतावा 15 लाख 93 हजार 937 रुपये होईल.

मुलांच्या भविष्यासाठी उत्तम पर्याय

ही योजना मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. पालक त्यांच्या दहा वर्षाखालील मुलांच्या नावाने NCS योजनेत खाते उघडू शकतात. मुलांचे शिक्षण आणि भविष्यातील गरजांसाठी पूर्वनियोजन करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी ठरू शकते. मुलांच्या खात्याचे व्यवस्थापन पूर्णपणे पालकांच्या हातात असेल त्यामुळे त्यांना मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण होईल.

हे पण वाचा| उन्हाळी कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

NCS मध्ये गुंतवणूक कशी करावी?

NCS मध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे.

  • सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.
  • त्या ठिकाणी NCS अर्ज फॉर्म घ्या आणि तो अचूक भरा.
  • आधार कार्ड पॅन कार्ड पत्ता पुरावा यासारखी कागदपत्रे त्या फॉर्मशी जोडा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा.

ज्यांना बाजारातील चढउतारांचा धोका नको आहे आणि खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल त्यांच्यासाठी ही योजना एक उत्तम पर्याय आहे. ही योजना बाजारपेठेवर अवलंबून नसल्याने आणि पूर्णपणे स्थिर असल्याने कोणतीही जोखीम निर्माण होत नाही. तुम्हीही तुमच्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर मार्गाने पैसे वाढू इच्छित असाल तर लगेच जवळील पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि NCS मध्ये आपले खाते उघडून या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. Post Office NSC Scheme

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Post Office NSC Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून 5 लाखांपर्यंत परताव मिळवा..!”

Leave a Comment

error: Content is protected !!