Maharashtra Monsoon update: पुढील 3 दिवस राज्यात होणार जोरदार पाऊस; या भागात मुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Monsoon update: मागील काही दिवसापासून मुंबईतील नागरिकांना पावसाने थोडी विश्रांती दिली होती. मात्र आता ही विश्रांती संपले असून या आठवड्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या मुंबईच्या आकाशात कळ्या ढगाची गर्दी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने आज दिवसभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. केवळ आजच नाही तर पुढील तीन दिवस राज्यात मान्सूनचा जोरदार पाऊस होणार आहे. असे हवामान खात्याने स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे नेहमीप्रमाणेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरीतील प्रसिद्ध सबवे पुन्हा एकदा पाहण्यासाठी गेले असून, प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळच्या सुमारास पश्चिम महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास विलंब झाला आहे. विशेषतः घाटकोपर स्टेशन बाहेरच्या रस्त्यांना तर अक्षरशः नदीचे स्वरूप मिळाल्यामुळे या ठिकाणी तुडुंब पाणी भरले होते त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. Maharashtra Monsoon update

ठाणे शहरासाठी दुपारपासूनच पावसाचा धूर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. केवळ मुंबई ठाणेच नव्हे तर संपूर्ण राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता असून काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान विभागाने आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात 35 मीमी पाऊस नोंदवला आहे. जी मान्सूनच्या पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत आहेत. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यासह संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याचा अर्थ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा| या बँकेत तुमचे खाते आहे का? या दोन बँकांनी घेतला मोठा निर्णय, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

राज्यात पुढील तीन दिवस महत्त्वाचे

भारतीय हवामान विभागाने 21 ते 23 जुलै या कालावधीत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पाडा असे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळा पाणी साचलेल्या किंवा पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये जाणे टाळा आपल्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घ्या. असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. एकंदरीत पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी पावसाच्या असतील. निसर्गाच्या या रुद्रावताराला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

ही काळजी घेणे गरजेचे

  • जर प्रवास करणे आवश्यक असेल तर वाहतूक माहिती तपासा आणि पर्यायी मार्गाचा विचार करा.
  • विद्युत उपकरणे सुरक्षित ठेवा वीज कोसळण्याची शक्यता असल्याने झाडाखाली किंवा खांबाजवळ उभे राहू नका.
  • पाणी साचलेल्या ठिकाणी गाडी घालू नका किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नका.
  • पाण्याची बाटली, फर्स्ट एड किट आणि आवश्यक औषधे नेहमी सोबत ठेवा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Maharashtra Monsoon update: पुढील 3 दिवस राज्यात होणार जोरदार पाऊस; या भागात मुसळधार पावसाचा इशारा”

Leave a Comment

error: Content is protected !!