Maharashtra Rain : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा अंदाज जाहीर! वाचा सविस्तर माहिती


Maharashtra Rain | खरंतर यंदा मे महिना उन्हाळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि याच महिन्यामुळे राज्यातील खरीप हंगामावरती मोठा फटका बसला आहे. मान्सूने वेळ आधीच आगमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिला खरा, पण आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे जून जुलै च्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. परंतु आता पुन्हा पावसाने ब्रेक घेतलेला आहे परंतु आता पुन्हा 15 जुलैपासून हळूहळू होऊ सक्रिय होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच हवामान खात्याने एक मोठा अंदाज वर वर्तवलेला आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Maharashtra Rain

तब्बल दहा ते बारा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा राज्यात हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 17 जुलैपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना थेट येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ढग दाटून आले असले तरी पावसाचा जोर एक ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, अरबी समुद्रातून पुन्हा एकदा दमदार वारे सक्रिय होऊ लागली आहेत, आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाऊस रंगात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर नादेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.

तज्ञांच्या मते, सध्या काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी २० जुलै नंतर महाराष्ट्रात पावसाचा दुसरा फेर पुन्हा धडकणार आहे. कोकणामध्ये ढगाळ वातावरण तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या भागांमध्ये 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पाडण्याची शक्यता आहे.

खरीप पेरणीसाठी जे शेतकरी अद्याप प्रतीकक्षेत आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी संधी असू शकते. ज्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे पाणी साठवण व शेतकामांची तयारी ठेवा, तसेच विजांच्या कडकडाटमुळे विजांपासून सावध रहाणे गरजेचे आहे. आणि दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला.

(Disclaimer: वरील गेली माहिती ही प्रसारमाध्यम व हवामान खात्याच्या आधारित आहे, यामुळे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी हवामान विभागाच्या सूचनेकडे लक्ष द्या.)

हे पण वाचा | हवामान खात्याचा नवीन अंदाज कोणत्या जिल्ह्यांना ठरणार विशेष वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!