Cotton Market: यावर्षी कापसाला किती भाव मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..


Cotton Market: शेतकरी बांधवांना यावर्षी कापसाच्या घराबद्दल उत्सुकता आहे. यावर्षी नवीन हंगामामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत कापसाला नेमका किती भाव मिळू शकतो. याचा सविस्तर आढावा आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. मागील वर्षाच्या आकडेवारी सध्याची बाजारातील स्थिती आणि आगामी काळातील अंदाज या सर्वांचा विचार करून आपण एक अंदाज स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. यावर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली असून हा हंगामात कापसाला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

मागील वर्षाचे आणि सध्याचे कापसाचे दर

त्यांना सर्व माहिती कापूस बाजारातील मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील सरासरी किमती पहिल्या तर आपल्याला एक कल दिसतो.

  • ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये कापसाचा भाव 7939 रुपये प्रतिक्विंटल एवढा होता.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 मध्ये तो वाढून 8710 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 मध्ये त्यात घट होऊन तो 7,079 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

वरील आकडेवारीतून हे स्पष्ट होते की कापसाच्या भावात चढ-उत्तर त्यांनी होत आहे. खरीप हंगाम 2025,26 साठी मध्यम धाग्यांच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत 7710 प्रति क्विंटल जाहीर झाली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे कारण यामुळे दरांना एक किमान आधार मिळेल. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने केलेल्या अभ्यासानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत कापसाला 7400 ते 8400 रुपये प्रति क्विंटल तर मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अंदाज अनेक घटकावर आधारित देण्यात आला आहे.

हे पण वाचा| मान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी! शेतकऱ्यांची चिंता वाढली; या भागात दुष्काळाचं सावट

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार, राज्यात सन 2024 25 मध्ये एकूण कापसाचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 1073 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. हे सकारात्मक चिन्ह असले तरी देशात चालू वर्षाच्या मे 2025 मध्ये कापसाचे आवक मागील वर्षाच्या मे 2024 च्या तुलनेत 49.84 टक्क्यांनी घटली आहे. अवकेतील ही मोठी घट बाजारात कापसाची उपलब्धता कमी असल्याचे दर्शवते ज्यामुळे दारात वाढ होण्याची शक्यता आहे. Cotton Market

USDA–FAS च्या अंदाजानुसार, मी पण वर्ष 2024 25 मध्ये भारतातील कापूस उत्पादन 25.4 दशलक्ष 480 IB BALES अपेक्षित आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी मका आणि भात यासारख्या अधिक प्रताप देणाऱ्या पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे पेरणी केलेल्या 12.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्याने कमी झाल्या आहेत. लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्यास भविष्यात कापसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वरील सर्व घटकांचा विचार करता ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 च्या काळात कापसाचे दर 7400 ते 8400 रुपये प्रति क्विंटल राहण्याचा अंदाज आहे. जाहीर झालेल्या किमान आधारभूत किंमत आणि बाजारातील अवकेतील घट यामुळे कापसाच्या दराला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची विक्री करताना बाजारातील सध्याची स्थिती आणि स्थानिक मागणी पुरवठ्याचा विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपला कापूस बाजारात विकण्यासाठी घेऊन जावा असे आव्हान करण्यात आले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Cotton Market: यावर्षी कापसाला किती भाव मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..”

Leave a Comment

error: Content is protected !!