IMD Monsoon Update: मान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी! शेतकऱ्यांची चिंता वाढली; या भागात दुष्काळाचं सावट


IMD Monsoon Update: यावर्षी मानसून ने महाराष्ट्रात लवकर आगमन केल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. मात्र हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढली आहे. मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अजूनही असमान असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान राज्यात पावसाची स्थिती गंभीर होत चालली आहे. दरवर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सात जून च्या आसपास दाखल होत असतो पण यावर्षी 25 मे रोजीच मान्सूनने राज्यात हजेरी लावली आहे. राज्यात यावर्षी पावसाची स्थिती कशी राहणार याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेऊया.

सुरुवातीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होते. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले. मात्र 30 मे नंतर पुन्हा 20 जून च्या आसपास पावसाने विश्रांती घेतली. पावसाच्या या अनिश्चितेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या पण आता अनेक भागांमध्ये विशेषता मराठवाड्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरलेली पिके सुकून चालली आहेत. एवढेच नाही तर या भागातील अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची आवश्यकता भासू लागली आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! या महिलांना मिळणार 3,000 रुपये?

हवामान विभागाचा नवीन अंदाज काय आहे?

दरम्यान हवामान तज्ञ एचडी सानप यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार मराठवाड्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. तुरळक ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र मोठ्या पावसाची शक्यता खूपच कमी आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातही पुढील दोन-तीन दिवसात मोठा पाऊस होणार नाही. मात्र 20 जुलै नंतर पावसाचा जोर चांगलाच वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD Monsoon Update

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत गांभीर्यजनक बातमी आहे. चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आता संकटात सापडला आहे. या भागात पुढील काही दिवस पाऊस झाला नाही तर पिके सुकून दुबार पेरणीची गरज भासू शकते. वेळेवर पाऊस न पडल्यास आर्थिक नुकसानी सोबतच पिकाच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या भागातील शेतकरी चिंताजनक झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असले तरी हवामान विभागाच्या पुढील अंदाजानुसार आणि पावसाच्या परिस्थितीवरच या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून राहणार आहे. सरकारने आणि प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील हे दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकऱ्यांच्या शेतीत हिरवा सोनं चांगलं पिकेल अशी अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “IMD Monsoon Update: मान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी! शेतकऱ्यांची चिंता वाढली; या भागात दुष्काळाचं सावट”

Leave a Comment

error: Content is protected !!